सुलक्षणा शिलवंत यांना आदेश बाबांचे आशीर्वाद भाविकांनी केले समाधान व्यक्त

पिंपरी
आदेश बाबा अर्थात माऊली वाळुंजकर यांचे आशीर्वाद पिंपरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत यांनी आज घेतले.
आदेश बाबा अर्थात माऊली वाळुंजकर यांचे परिसरात हजारो भाविक आहेत. आज सुलक्षणा शिलवंत यांनी माऊली वाळुंजकर यांचे दर्शन घेतल्याचे समजतात अनेक भाविक भक्तांनी समाधान व्यक्त व्यक्त केले.
माऊली वाळुंजकर हे बहुजन समाजाला सातत्याने समाज प्रबोधनाचे काम करणारे अध्यात्मिक व्यक्तित्व म्हणून ओळखले जातात.
समाजाच्या तळागाळातल्या घटकाला त्यांचे मार्गदर्शन खूप मोलाचे ठरत आले आहे. अनेक कुटुंबांना त्यांनी त्यांच्या मौलिक विचाराने हातभार लावण्याचे काम केले आहे शेकडो तरुणांना व्यसनापासून दूर ठेवण्याचे काम माउली वाळुंजकर यांनी अर्थात आदेश बाबांनी केले आहे. माऊलींच्या विचाराचा पगडा मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांवर आहे. आज त्यांचे आशीर्वाद सुलक्षणाशीलवंत यांना प्राप्त झाल्याने त्यांच्या भाविक भक्तांनी आनंद व्यक्त करत या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.