आरोग्य

डी वाय पाटील आयुर्वेद कॉलेज तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबीर

दि. १६ ते २१ जून मध्ये होणार शिबीर

पिंपरी (प्रतिनिधी)येथील डॉ . डी. वाय पाटील विद्यापीठ संलग्नित डॉ . डी. वाय पाटील आयुर्वेद रुग्णालय व संशोधन केंद्र, पुणे येथे दि. १६ जून २०२५ (सोमवार) ते २१ ऑगस्ट २०२५ (शनिवार ) पर्यंत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये संधिवात, आमवात, पक्षाघात , वातरक्त, मधुमेह, दमा, केस गळणे,- पांढरे होणे, रक्तदाब, लठ्ठपणा,त्वचा विकार ,सर्व प्रकारच्या पंचकर्म चिकित्सा -सल्ला मार्गदर्शन , बाल पक्षाघात पोटदुखी, जंतांचा त्रास, लहान मुलांमधील त्वचा विकार, मुलांचे वजन न वाढणे- भूक न लागणे , शय्यामूत्रता (अंथरुणात लघवी करणे) इ. तसेच स्रियांचे सर्व विकार, वंध्यत्व चिकित्सा , प्रसुतीपूर्व तपासणी, सौंदर्योपचार , हृदयरोग, पोटाचे विकार पित्ताशयातील खडे,शरीरावरील लहान-मोठ्या गाठी मूळव्याध , भगंदर, फिशर, हर्निया, अपेंडिक्स, हायड्रोसिल, मुतखडा, व मोतीबिंदू ऑपरेशन अल्प दरात उपलब्ध आहेत, त्याच प्रमाणे डोळे, कान, नाक, घसा यावरील उपचार व सल्ला मार्गदर्शन व आहारविषयक व योगविषयक मार्गदर्शन केले जाईल. वरील आजारांवर तीन दिवसांची औषधे मोफत देण्यात येतील. चिकित्सा झालेल्या रुगणांना पुढील उपचारासाठी आंतररुग्ण विभागात मोफत राहण्याची व जेवणाची सुविधा उपलब्ध असेल. सदर आरोग्य तपासणी शिबीर डॉ .डी. वाय पाटील आयुर्वेद रुग्णालयामार्फत राबविण्यात येत आहे.
स्थळ:- डॉ . डी. वाय पाटील आयुर्वेद रुग्णालय, पिंपरी, पुणे.
संत तुकाराम नगर, पवना इंडस्ट्रीज जवळ, डेंटल कॉलेजच्या मागे.
वेळ :- स. ९ ते दु. ४ व. पर्यंत.
जास्तीत जास्त नागरिकांनी शिबिराचा लाभ घ्यावाअधिक माहितीसाठी ७७९६६६३३६६ या क्रमांकमावर संपर्क साधावा.

धन्यवाद .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button