दिवाळी अंक हा नव लेखकांसाठी एक व्यासपीठ – पद्मश्री प्रभुणे
धनश्री दिवाळी अंकाच्या प्रकाशन सोहळ्यात राजेंद्र पवार यांना पुरस्कार प्रदान

धनश्री दिवाळी अंकाच्या प्रकाशन सोहळ्यात राजेंद्र पवार यांना पुरस्कार प्रदान
पिंपरी (प्रतिनिधी) दिवाळी अंक काढणे संपादकांसाठी खूपच खडतर असते. नवीन लेखकांसाठी दिवाळी अंक एक व्यासपीठ असल्याने साहित्य प्रसिद्ध होणे ही बाब नवीन लेखकांना आनंददायी बाब असते. कारण नवीन लेखकांना दिवाळी अंकात सर्व प्रथम स्थान मिळते. दिवाळी अंकातूनच प्रथितयश लेखक घडतात . असे
प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी केले.
चिखली येथील शब्द पब्लिसिटी निर्मित 10 व्या धनश्री दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा चिंचवड येथील प्रतिभा कॉलेजमध्ये पार पडला. यावेळी महावितरण पुणे परिमंडळाचे मुख्य अभियंते राजेंद्र पवार यांना प्राईड ऑफ महाराष्ट्र पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.
यावेळी पटकथा लेखक संजय नवगिरे ,श्रीकांत चौगुले, संतोष सौंदणकर, अधीक्षक अभियंते सिंहाजीराव गायकवाड व अरविंद बुलबुले आणि महावितरण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते .
तसेच धनश्री दिवाळी अंकासाठी योगदान देणाऱ्या लेखकांचा गौरव करण्यात आला .
यावेळी राजेंद्र पवार म्हणाले कि, समाज सुधारण्यासाठी साहित्य हे प्रभावी माध्यम आहे. म्हणून लेखकांच्या शब्दाला मोल आहे. दिवाळी अंकाशिवाय साहित्य पूर्ण होत नाही.माझ्या गावात वीज नव्हती लहानपणापासून विजेच्या दिव्याचे आकर्षण होते. आपण समाजात प्रकाशमान करण्याचा तेव्हा केला आज या पदापर्यंत पोचलो. दिवाळी अंक आणि महावितरण समाजात प्रकाश पसरविण्याचे कार्य करतात.
श्री.चौगुले म्हणाले कि, दिवाळी हा आनंदोत्सव आहे. दिवाळी अंकाच्या रूपाने साहित्यिक, सांस्कृतिक आनंद असतो. दिवाळी अंक हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैशिष्ट्ये आहे. त्याला 115 वर्षांची परंपरा आहे. ती जपण्यासाठी लेखक, संपादक आणि वाचक या सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
नवगिरे म्हणाले कि, चित्रपटासाठी मागणीनुसार लिखाण करावे लागते.दिवाळी अंकातील लेखन हे स्वानुभ आणि स्वानंद देणारे असल्याने ते अस्सल व दर्जेदार साहित्य असते. कविता सादर करून रसिकांसोबत संवाद साधला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संपादक शिवाजी घोडे यांनी तर स्वागत रेखा घोडे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.संतोष पाचपुते तर आभार धनश्री घोडे यांनी मानले.