पुणे

सीएमएस शाळेत विभागीय नाट्य स्पर्धा संपन्न

25 नाट्य संघांनी सादर केली आपली कला

पिंपरी(प्रतिनिधी) पुणे जिल्हा परिषद आणि पुणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कारण्यात आलेली कै. यशवंतराव चव्हाण आंतरशालेय तालुका/विभागस्तरीय नाट्य स्पर्धा निगडीतील सीएमएस शाळेत संपन्न झाली.

पिंपरी चिंचवड विभागीय नाट्य स्पर्धा दोन दिवसीय सी.एम.एस इंग्लिश मिडियम हायर सेकंडरी स्कूलमध्ये आयोजित केली होती.
या स्पर्धेमध्ये 17 शाळा सहभागी झाल्या होत्या तर २५ नाट्य संघांनी आपले नाट्य प्रयोग सादरीकरण केले .

प्रमुख पाहुणे नाट्य कलावंत प्रभाकर पवार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष चिंचवड मळ्याळी समाजमचे अध्यक्ष टी.पी. विजयन, सरचिटणीस सुधीर सी. नायर, उपाध्यक्ष पी. श्रीनिवासन, कलावेदी समन्वयक पी. व्ही. भास्करन , प्राचार्य डॉ. बिजी पिल्ले, मुख्याध्यापिका चैताली लोंढे आदी उपस्थित होते.
यावेळी श्री पवार यांनी नाट्य स्पर्धा आयोजनाबाबतीत शाळेचे कौतुक करीत अशा स्पर्धेतून भविष्यात उत्तम कलावंत घडतील.असा विश्वास व्यक्त केला.
सीएमएसचे अध्यक्ष विजयन म्हणाले कि,शालेय स्तरीय स्पर्धेतून विद्यार्थ्यांमधील कला गुणांचे दर्शन होते.अशा स्पर्धा नवोदित कलाकारांसाठी एक उत्तम व्यासपीठ आहे.
या स्पर्धेसाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण मंडळाच्या यशवंतराव चव्हाण आंतरशालेय नाट्यस्पर्धा कार्याध्यक्ष शंकर घोरपडे,अभिनेत्री प्रा. शालिनी सहारे, बालनाट्य परीक्षक गणेश दिघे यांनी परीक्षक म्हणून काम पहिले.या स्पर्धेतून उत्कृष्ठ संघाला जिल्हास्तरीय नाट्य स्पर्धेसाठी निवड केली जाणार आहे.
यावेळी सावली, पैंजण, विषय गेले पळून, जनसेवा हीच ईश्वरसेवा,कॅनवास ऑफ चाओस,ट्रॅफिक रूल्स,क्या भविष्य भी कभी सच होता है? अशी सादर केलेल्या नाटकांची नावे होती.
यावेळी सूत्रसंचालन सजिता पिल्ले यांनी केले,स्वागत भाषण गणेश वारे केले. आभार श्रुतिका देशमुख यांनी मानले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button