सामाजिकपिंपरी चिंचवड

गाडगेबाबा हे ग्रामीण क्रांतिकारक संत होते – काशिनाथ नखाते*

कष्टकरी महासंघाकडून गाडगे बाबांची जयंती साजरी

*

पिंपरी दि.२३ – संत गाडगेबाबा यांनी महाराष्ट्रामध्ये सर्वत्र लोकवर्गणीतून अनेक गोशाळा, धर्मशाळा, दवाखाने, वसतीग्रह उभे केले तेवढा त्यांच्या कार्यावरती जनतेचा विश्वास होता.एक वैज्ञानिक दृष्टिकोनातून समाज सुधारण्याचे प्रयत्न केले. कीर्तनातून अंधश्रद्धा उखडून टाकण्यासाठी प्रयत्न करत चांगले विचार जनमानसात रुजवण्यासाठी त्यांचे विचार नेहमी मार्गदर्शक राहतील गाडगेबाबा हे क्रांतिकारक संत होते असे मत कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले.

कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र,महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ यांच्यातर्फे महासंघाचे प्रांगणामध्ये चिंचवड येथे कामगांराच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून बाबांची जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी राजू बिराजदार,इरफान चौधरी, किरण साडेकर, अमोल भंडारी,नंदू आहेर,सलीम डांगे,बालाजी लोखंडे, अंबादास जावळे, रवींद्र गायकवाड, संभाजी वाघमारे,माधुरी जलमुलवार,सुनिता दिलापाक, माया शेटे, अरुणा सुतार, अंजना जाधव, रोहिणी काळे, वंदना भोसले, अनिता यादव,
आदी उपस्थित होते.

भारतात स्वच्छतेची ओळख ज्यांनी सर्वप्रथम समाजासमोर मांडणी ते गाडगेबाबांनी तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी धर्मशाळा बांधल्या गोरगरीब यात्राकरूना मोफत निवासाची व्यवस्था केली. समाजातील घाण साफ करायला पवित्र व स्वच्छ दृष्टिकोन असायला पाहिजे तो त्यांच्याकडे होता.धर्माच्या नावाखाली दिले जाणारे पशुबळी तसेच तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी होणारी भाविकांची लूट याला विरोध केला. व्यसनाधीनतेला कायम विरोध केला. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या विचारातून गाडगेबाबांनी मानवधर्माची एक नवी साखळी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी कीर्तनातून, प्रबोधनातून आदर्श समाज घडवण्याचे काम केले आहे असेही नखाते यांनी नमूद केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button