
आकुर्डी दि ५: पुणे महापालिकेच्या वतीने अमृतवर्ष वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या बोधचिन्ह स्पर्धेत पहिल्या क्रमांकांचे बक्षीस मिळणाऱ्या कु.तनुजा नाणेकर हिचा विशेष सत्कार शैक्षणिक संकुलाचे उपाध्यक्ष आ. सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
कु तनुजा नाणेकर हिने पावणे दोन लाख रुपयाचे बक्षीस ही जिंकले. कु तनुजा आकुर्डी येथील डी वाय पाटील आंतरराष्ट्रीय विद्यापीठातील उपयोजित कला विभागाच्या प्रथम वर्षांत शिकत आहे.
या बोध चिन्हाचा वापर पुणे महानगर पालिका वर्षभर चालणाऱ्या अमृत मोह्त्सवात करणार आहे.
कौतुकास्पद यश प्राप्ती बद्धल तिचा विशेष सत्कार शैक्षणिक संकुलाचे उपाध्यक्ष आ. सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी कुलगुरू प्रो. प्रभात रंजन, शैक्षणिक संकुलाचे संचालक रिअल अडमिरल अमित विक्रम (निवृत्त) , मुख्य वित्तधिकारी बिपिन शर्मा, स्कूल ऑफ अप्लाइड आर्टचे प्राचार्य जयप्रकाश कलवले व वर्गशिक्षक प्रा. शरद वडकर उपस्थित होते. कु. तनुजा नाणेकरने मिळविलेल्या यशाबदल विस्वस्त तेजस पाटील यांनी अभिनंदन केले. तसेच कलेच्या शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रात सर्वत्र मोठ्या प्रमाणात तिचे कौतुक होत आहे.