ई-कॉमर्स: महिला सक्षमीकरण” विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन
भोसरी च्या जिजामाता कॉलेजमध्ये होणार परिषद

राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील वाणिज्य विभाग तसेच ICMR डुडुळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने दि. ८ मार्च २०२५ रोजी “ई-कॉमर्स: महिला सक्षमीकरण” या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय परिषद आयोजित केली आहे. ही परिषद हायब्रीड मोडमध्ये होईल, ज्यामध्ये रिसर्च फेलो, स्कॉलर्स, फॅकल्टी, उद्योजक आणि विद्यार्थी यांचा सहभाग अपेक्षित आहे.
राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष विलास लांडे, सचिव सुधीर मुंगसे, खजिनदार अजित गव्हाणे, प्राचार्य डॉ. के. जी. कानडे, उपप्राचार्य किरण चौधरी, आणि प्रबंधिका अश्विनी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही परिषद आयोजित करण्यात येत आहे.
या परिषदेत सादर केलेले संशोधन पेपर महाविद्यालयाच्या कार्यवाहीत प्रकाशित करण्यात येतील, तर निवडलेले पेपर ISSN क्रमांकासह पीअर रिव्ह्यूड जर्नलमध्ये प्रकाशित केले जातील.
या महत्त्वपूर्ण परिषदेचे आयोजन महिलांच्या ई-कॉमर्स क्षेत्रातील सक्षमीकरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरेल.