सामाजिक

रोटरी क्लब निगडीकडून कै.कुटे रुग्णालयास वैदयकीय यंत्र सामग्री भेट

एटीएस कंपनीचे लाभले विशेष सहकार्य

पिंपरी (प्रतिनिधी) रोटरी क्लब ऑफ निगडी यांच्या पुढाकाराने आणि एटीएस कन्व्हेयर्सच्या सीएसआर फंडातून आकुर्डी पालिकेच्या कै.कुटे हॉस्पिटलमध्ये नेत्ररोग शस्त्रक्रिया आणि बाह्यरुग्ण विभागाला लागणारी संपूर्ण यंत्र सामग्री देवून सेट अपची उभारणी केली . यासाठी सुमारे ३४ लाखाची वैद्यकीय यंत्र सामुग्री देण्यात आले.
यावेळी एटीएस ग्रुपचे अध्यक्ष डॅनियल रिफेल, संचालिका अ‍ॅन रिफेल ,सह व्यवस्थाकीय संचालक क्रिस्टोफे एव्हिटाबाईल, विभागातील वित्त अधिकारी संतोष रणावरे, एचआर प्रमुख कर्नल देशमुख, कै हभप प्रभाकर कुटे हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब होडगर,
यावेळी अध्यक्ष सुहास धमाले,प्रथम महिला सुजाता ढमाले,सिंघानिया,राणू राकेश सिंघानिया,नियोजित अध्यक्ष केशव मानगे,रमा मानगे,माजी अध्यक्ष जगमोहन भुर्जी
डॉ रवींद्र कदम, डॉ रंजना कदम,अंकाजी पाटील, जयंत येवले,सोनाली येवले,सुनील सुरी,समीर देशमुख, आरती मुळे,मुकुंद मुळे आदी मान्यवर उपस्थित होते.
रोटरीने दिलेल्या साहित्यामध्ये ऑप्टिक सर्जन चेअर युनिट वुईथ डिजिटल व्हिजन चार्ट बोर्ड, टोनोमीटर, केरॅटो मीटर, मायक्रोस्कोप, फ़ंडोस्कोप, ऑपथमोस्कोप, फॅको मशीन, तसेच इतर वैद्यकीय साहित्याचा समावेश आहे. तसेच एनआयसीयू विभागाला बेबी वारमर, फोटोथेरपी युनिट भेट देण्यात आले.
वैद्यकीय अधिकारी म्हणाले कि,डॉ.होडगर म्हणाले कि, रोटरीने दिलेल्या वैद्यकीय साहित्याचा उपयोग आज नवजात बालकांसाठी होतोय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button