पिंपरी चिंचवडराजकीय

साहेबांनी महिलांना केवळ मतदानाचा अधिकारच नव्हे तर नेतृत्वाची संधी दिली

सुलक्षणा शिलवंत यांची विजयाचा सार्थ विश्वास करणारी प्रचार सांगता

पिंपरी

शरद पवार साहेबांनी महिलांना केवळ मतदानाचा अधिकार दिला नाही तर त्यांना नेतृत्वाची संधी देखील उपलब्ध करून दिली आहे आणि तो विश्वास पिंपरी विधानसभा मतदार संघातील मतदार सार्थ करून दाखवतील असे उद्गार पिंपरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत यांनी व्यक्त केले.

सुलक्षणा शिलवंत यांनी परिसरात बाईक रॅली काढून गावडे कॉलनी चिंचवड येथे आपल्या प्रचाराची सांगता केली. आजची ही प्रचार सांगता म्हणजे पिंपरी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार सुलक्षणा शिलवंत यांचा विजय निश्चित करणारी रॅली ठरली आहे.

या रॅलीच्या समारोपप्रसंगी बोलत असताना सुलक्षणाशीलवंत म्हणाले की, शरद पवार साहेबांनी महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सहाय्य केले आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघात त्यांनी मला उमेदवारी दिल्याबद्दल आपण त्यांचे आभार व्यक्त करतो.

2019 मध्ये पिंपरी विधानसभेमध्ये त्यांनी मला उमेदवारी दिली होती परंतु काही राजकीय मंडळींनी आपला शहरावर ताबा राहावा आपली दहशत गुंडागिरी चालू राहावी व दडपशाहीने करोडोची माया जमवता यावी यासाठी म्हणून माझी उमेदवारी कापली. पण यावेळी जनतेची साथ जनतेचा विश्वास आणि जनतेचा समर्पण याने पिंपरी विधानसभा मतदारसंघात संपूर्ण परिवर्तनाचा इतिहास घडेल.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर आपण साहेबांबरोबरच राहिलो त्यामुळे त्यांनी यावेळी मला संधी दिली आणि त्यांनी दाखवलेला हा विश्वास मतदार संघातील मतदार सार्थ करणार याबद्दल मनात शंका नसल्याचे त्यांनी सांगितले.

गेली महिनाभर या निवडणूक प्रचाराच्या माध्यमातून ज्या शेकडो कार्यकर्त्यांनी दिवस-रात्र मेहनत घेतली व मला विजयापर्यंत नेऊन ठेवले त्या सर्वांचे आपण आभार व्यक्त करतो असे म्हणत शिवसेनेचे नेते माजी आमदार गौतम चाबुकस्वार, आझम पानसरे, माजी नगरसेवक गोपाळ कुटे, दिनकर दातीर पाटील आदी ज्येष्ठ नेत्यांनी प्रचारादरम्यान जी सहकार्याची भूमिका घेतली त्याबद्दलही त्यांनी आभार व्यक्त केले.

आजच्या या प्रचार रॅलीस माजी आमदार गौतम चाबुकस्वार, काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष डॉ. कैलास कदम, माजी नगरसेवक बाबू नायर, सद्गुरु कदम आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button