आग्रोह विकास ट्रस्टच्या वतीने के एल बन्सल यांचा मुंबईत गौरव
आग्रोह विकास ट्रस्टच्या वतीने के एल बन्सल यांचा मुंबईत गौरव

आग्रोह विकास ट्रस्टच्या वतीने के एल बन्सल यांचा मुंबईत गौरव
मुंबई आग्रोहा विकास ट्रस्टचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष उत्तम प्रकाश अग्रवाल आणि महाराष्ट्र महामंत्री सीए के एल बन्सल यांचा भव्य सत्कार समारंभ मध्यवर्ती समितीचे मुंबई अध्यक्ष सचिन अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली मालाड येथे पार पडला.
आग्रोह विकास ट्रस्ट सेंट्रल कमिटी मुंबईचे उपाध्यक्ष महावीर गुप्ता, सरचिटणीस अल्केश अग्रवाल, कोषाध्यक्ष रवी अग्रवाल, प्रचार मंत्री महेश अग्रवाल, सहमंत्री उमाशंकर अग्रवाल, महिला समितीच्या अध्यक्षा रेखा गोयल आदी मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रीय अध्यक्ष उत्तम अग्रवाल आणि महामंत्री के.एल.बंसल यांचा पुष्पगुच्छ, शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
महाराष्ट्राचे महामंत्री सीए के. एल बन्सल यांनी समाजातील लोकांना संबोधित करून समाजाने एकजूट राहून सहकार्य करण्याचे आवाहन केले. त्यांनी सर्व नागरिकांना त्यांच्या आरोग्याबाबत काळजी घेण्याची विनंती केली.
“समाजाने माझ्यासाठी काय केले याचा विचार करण्यापेक्षा मी समाजासाठी काय केले याचा विचार करून आपल्या क्षमतेनुसार तन, मन आणि धनाने समाजासाठी काम केले पाहिजे.”
कार्यक्रमात 500 हून अधिक अग्र बांधव सहभागी झाले होते.