
चिंचवड (प्रतिनिधी) महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागवी आणि भोसरीतून हॅट्रिक करणारे आमदार महेश लांडगे यांना मंत्रिपद मिळावे यासाठी जाधव दाम्पत्याने मांढरदेवीच्या काळुबाई चरणी अभिषेक करून साकड घातले.
शाहू नगर चिंचवड येथील प्रभाग क्रमांक 11 मधील सामाजिक कार्यकर्त्या सौ किर्ती मारुती जाधव यांनी (दि.28 रोजी) सातारा जिल्ह्यातील मांढरदेवी काळुबाई या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस व भोसरीचे कार्यसम्राट आमदार मंत्रिपद मिळावं यासाठी मांढरदेवी ला जाऊन देवीला रुद्राभिषेक केला आणि देवीला साकडे घालण्यात आले. या प्रसंगी जाधव कुटुंबीय उपस्थित होते.
मारुती जाधव हे शाहू नगर परिसरात अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात सक्रिय आहे. त्यांनी कोरोना काळात केलेल्या रुग्ण सेवा ही राज्यभर लक्षवेदी ठरली. या त्यांच्या कार्यात पत्नी कीर्ती जाधव यांचा सिंहाचा वाटा आहे.