क्रिडापिंपरी चिंचवड
राधेश परदेशी रायफल शूटिंग मध्ये दुसरा
आकुर्डीच्या डि वाय पाटील ज्यू. कॉलेजचा विद्यार्थी

पिंपरी (प्रतिनिधी) डॉ. डी.वाय पाटील शैक्षणिक संकुल आकुर्डी मधील अकरावी सायन्सचा विद्यार्थी राधेश परदेशी याने 22 नोव्हेंबर 2024 रोजी इंटर स्कूल एस एफ ए चॅम्पियनशिप मध्ये एअर रायफल स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे रौप्य पदक प्राप्त केले.
डॉ. डी वाय. पाटील शैक्षणिक संकुलाचे विश्वस्त तेजस पाटील, व्यवस्थापक एडमिरल अमित विक्रम, प्राचार्य डॉ. एच डी बिरादार तसेच संस्थेतील शिक्षकवृंद यांनी प्रोत्साहन व मार्गदर्शन केले.