मुलांमधील कला-गुणांचा विकास करावा- ऑलिम्पिकवीर आकोटकर
बालाजी इंग्लिश स्कुलमध्ये क्रीडा सप्ताहाचे उदघाटन

पिंपरी (प्रतिनिधी)आजचे विद्यार्थी हे देशाची खरी शान आहे. शालेय जीवनात विद्यार्थ्यांमधील गुणांची चुणूक दिसून येत असते. पालक – शिक्षकांनी मुलांमधील कला गुण ओळखून त्यांच्या गुणांचा विकास करावा. असे उदगार ऑलिपकवीर श्री. बाळकृष्ण आकोटकर यांनी काढले.
चिखली मोरे वस्ती येथील बालाजी इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा सप्ताहाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते .
यावेळी बालाजी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सुवर्णा स.जरे, संचालक सचिन जरे मुख्याध्यापिका ज्योत्सना फाळके, पत्रकार शिवाजी घोडे उपस्थित होते.यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते क्रीडा ज्योत पेटवून उदघाटन कारण्यात आले.
यावेळी शिवकालीन युद्धकलेतील लाठीकाठी, सिलंबम,तलावरबाजी,दांडपट्टा,चक्री तसेच मार्शल आर्टचे प्रत्यक्षिके
भक्ती दहिफळे , माहि चौधरी, हेमनात पिल्लाई, गणेश मोरे या विद्यार्थ्यांनी क्रीडा प्रकाराचे प्रत्यक्षिके करून दाखवले.
सचिन जरे म्हणाले कि,आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मन आणि शारीरिक सुदृढ असणे गरजेचे आहे.निरोगी आयुष्य जगण्यासाठी मनाला अभ्यास आणि शरीराला व्यायामाची गरज असते. आयुष्यात एकतरी छंद जोपासला पाहिजेत. त्यातून मनोरंजनही होईल, अन मनहीआनंदीझळ, सुदृढ राहील.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्योत्सना फाळके यांनी केले. सूत्रसंचालन असमा खान, वैष्णवी कांबळे, जॉन ओहोळ यांनी केले तर आभार राधिका पवार हिने मानले. क्रीडा शिक्षक चैतन्य शिगवण व प्रफुल्ल प्रधान यांनी विशेष परिश्रम घेतले.