
चिंचवड येथील एम आर सूर्य सोशल फाउंडेशन व सूर्य इलेक्ट्रॉनिक्स च्या वतीने घेण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेऊन 125 जणांनी रक्तदान केले.
या कार्यक्रमासाठी मुख्य उपस्थिती म्हणून लाभलेले पाहुणे इरफानभाई सय्यद , उपनेते शिवसेना (शिंदे गट) रामलालजी चौधरी,चंदूलालजी भायल, हिरालालजी राठोड, सचिन निवगुने,सुनील गेहलोत,मोहनजी चौधरी आदी मान्यवर मंडळींनी कार्यक्रमाची शोभा वाढवली.
श्री रमेश जी चौधरी चेअरमन सूर्य इलेक्ट्रॉनिक्स, यांनी या महारक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.व तसेच समाजाला व तरुण पिढीला एक नवीन संदेश दिला रक्तदान हेच जीवनदान व यासाठी ते स्वतः आपल्या सर्वांच्या माध्यमातून प्रयत्न करत आहेत.
तसेच चौधरी यांनी सर्व रक्तदात्यांना मानचिन्ह देऊन सत्कार केला.