पिंपरी चिंचवड भूलतज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ शेठ
पिंपरी चिंचवड भूलतज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ शेठ

पिंपरी (प्रतिनिधी)अखिल भारतीय भूलतज्ञ संघटनेच्या पिंपरी चिंचवड शाखेच्या अध्यक्षपदी डॉ भावेश शेठ यांची तर सचिव पदी डॉ उमा देशमुख तर खजिनदार पदी डॉ बागेश्री वाबळे यांची निवड करण्यात आली. आकुर्डी येथे एका कार्यक्रमात नवीन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला .
यावेळी महाराष्ट्र भुलशास्त्रतज्ज्ञ संघटनेचे अध्यक्षा डॉ अनिता नेहते,नियोजित अध्यक्ष अविनाश भोसले,खजिनदार डॉ विकास कर्णे , एसएपीसी ट्रस्टचे अध्यक्ष डॉ सुमित लाड, सचिव डॉ. माया भालेराव, मावळत्या अध्यक्षा डॉ. शोभा व्हटकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ट्रस्टच्या मावळत्या अध्यक्षा डॉ शोभा जोशी यांना मानपत्र व सन्मानचिन्ह देवून विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या मनापत्राचे वाचन डॉ. शुभांगी कोठारी यांनी केले.
यावेळी संघटनेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त यांचा सत्कार करण्यात आला.
जागतिक भूलदिनानिमित्त डी.वाय.पाटील हॉस्पिटल पिंपरीच्या विभाग प्रमुख डॉ.छाया सुर्यवंशी आणि मायमर हॉस्पिटल मधील विभागप्रमुख डॉ.शिल्पा गुरव यांनी विविध उपक्रम राबवले.
यावेळी डॉ भाविनी शहा, डॉ मनीषा सपाटे यांनी संपादित केलेल्या माहिती पुस्तिकाचे प्रकाशन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ अदिती येलमार, डॉ बागेश्री वाबळे यांनी केले.