पिंपरी चिंचवडसामाजिक

पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाचे पीसीएमसी टॉप टेन पुरस्कार

गोयल,डॉ.डोळस,पीसीईटी रेडिओ,साकोरे,यादव, सय्यद,गायकवाड यांचा समावेश

पिंपरी, पुणे (दि. ३० जानेवारी २०२५) अखिल मराठी पत्रकार संस्था (रजि) म. राज्य संलग्न पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघातर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा “पीसीएमसी टॉप टेन” पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे.

शुक्रवारी (दि.३१) सकाळी ११: ३० वा. आकुर्डी, हॉटेल किरियाड येथे होणाऱ्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार शंकर जगताप तर कायनेटिक कंपनीचे चेअरमन अरुण फिरोदिया, खासदार श्रीरंग आप्पा बारणे, आमदार आण्णा बनसोडे, महेश लांडगे, उमाताई खापरे, अमित गोरखे, ज्येष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत अशी माहिती पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
पुरस्कारार्थीमध्ये कृष्णकुमार गोयल (सहकार व उद्योग क्षेत्र), लक्ष्मण गोफणे (उत्तम प्रशासन), विजय जगताप (सामाजिक क्षेत्र), ऋतुराज गायकवाड (भारतीय क्रिकेटपटू), इरफान सय्यद
(कामगार क्षेत्र), डॉ. बी. सी. डोळस (वैद्यकीय क्षेत्र), गणेश यादव (पत्रकारिता), संदीप साकोरे (कला व नाट्य क्षेत्र), अंजू सोनवणे (प्रेरणादायी रक्तदाते), पीसीईटी रेडिओ एफएम (प्रसार व मनोरंजन क्षेत्र) यांचा समावेश आहे.
——————————————–

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button