
पिंपरी चिचंवड महानगरपालिका व जिल्हा क्रीडा परिषद , पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने शासकीय कराटे स्पर्धेत पी. के. स्कूल अँड जुनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनींचे घवघवीत यश संपादन केले. शालेय विद्यार्थिनी खेळाडू कुमारी याशिका शिर्के वयोगट १७ वर्षे (मुली ) ४८ किलो वजन गटामध्ये सुवर्ण पदक तर मयुरी शिर्के वयोगट १७ वर्षे (मुली ) ५४ किलो वजन गटामध्ये सिल्वर मेडल मिळविले .
शाळेचे संस्थापक डॉ . जगन्नाथ काटे , प्रशालेच्या प्राचार्या प्रो. डॉ.धनश्री सोनवणे , क्रीडा शिक्षक राहुल कोरे सर यांनी याशिका शिर्के व मयुरी शिर्के या विद्यार्थिनींचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले . तसेच इतर विद्यार्थ्यांनी देखील खेळामध्ये सहभाग घ्यावा त्यामध्ये प्राविण्य मिळवावे असे मार्गदर्शन केले . त्याच बरोबर याशिका शिर्के , व मयुरी शिर्के या विद्यार्थिनींची विभागीय कराटे स्पर्धेसाठी निवड करण्यात आली . त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या .