कलापिंपरी चिंचवड

अभिव्यक्तीतून कलाकारांनी साकारला अफजल खानाचा वध

नृत्यांगना पायल गोखलेसह १२५ कलाकारांचा सहभाग

पिंपरी (प्रतिनिधी) चिंचवड येथील पायल नृत्यालयाच्या वतीने 125 पेक्षा जास्त विद्यार्थिनींचा सहभाग असलेला “अभिव्यक्ती” हा कथक नृत्याचा कार्यक्रम नुकताच प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात, 3 फेब्रु 2025 संपन्न झाला. यावेळी नृत्यांगना पायल गोखले आणि त्यांच्या शिष्यांनी आपल्या नृत्यातून शिवाजी महाराजांनी केलेला अफजल खानाच्या वधाचे दृश्य साकार करून महाराजांना मानवंदना दिली.या कलाकृतीला रसिकांनी उभे राहून टाळ्यांची दाद दिली आणि रसिकांनी प्रेक्षागृहात शिवरायांच्या नावाचा जायघोष केला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे प्रसिद्ध कथक नर्तक गुरु पं. डॉ. नंदकिशोर कपोते,श्रीकृष्ण कुलकर्णी आणि विजया कुलकर्णी उपस्थित होते. प्रसिद्ध कथक नृत्यांगना पायल गोखले यांनी कालिका स्तुतीने कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी आपल्या शिष्यांसमवेत धमार तालाची सुंदर अशी नृत्य प्रस्तुती सादर केली. त्यांच्या इतर शिष्यांनी कथक नृत्याच्या पारंपारिक रचना, जसे की परन, तराणा,सरगम, चतरंग, राम भजन, गणेश वंदना यासारख्या विविध रचना सादर केल्या. लहान मुलींसाठी जलचक्र, कर्नाटकी लोकगीत, घागर नृत्य यांसारखे नृत्यप्रकार ही लोकांच्या मनाला भावून गेले. त्याचबरोबर देशी भ्रमरींचा अभ्यास दाखवणारी pirouettes ( पिरूएट्स ) ही रचना पायल यांनी आपल्या ज्येष्ठ शिष्यांसोबत सादर केली . कथक नृत्य अत्यंत प्रभावी आहे व सर्व संगीत प्रकारांना आपल्यामध्ये सामावून घेते, याची प्रचिती देणारे कथक झेंबे हे फ्युजन यावेळेस सादर करण्यात आले. आफ्रिकन वाद्य जेम्बे वाजवत उत्तम अश्या कथक नृत्याच्या सादरीकरणाने प्रेक्षक अत्यंत भारावून गेले. त्याचबरोबर हे वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५०वे वर्ष आहे. त्याचबरोबर 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस येत असल्याच्या पार्श्वभूमीवर नृत्यांगना गोखले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजदरबारातील राजकवी कविराज भूषण यांच्या छंदकाव्यांवर आधारित ‘शिवभूषण’ ही रचना सादर केली. ही नृत्य प्रस्तुती प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेऊन गेली. याची वेळी प्रमुख पाहुणे डॉ. नंदकिशोर कपोते यांनी पायल नृत्यालायाच्या विद्यार्थिनींना आपल्या संभाषणातून अत्यंत मौल्यवान असे मार्गदर्शन केले. याच शुभमुहूर्तावर पायल नृत्यालयाचे बोध चिन्ह ( लोगो ) तसेच वेबसाईटचे अनावरण प्रमुख पाहुणे श्रीकृष्ण कुलकर्णी आणि विजया कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले . अत्यंत सुंदर अशा अभिव्यक्ती या कथक नृत्य संध्येने प्रेक्षकांची मने जिंकली.
सूत्रसंचालन मनश्री सुकेणकर यांनी केले तर रोहन गोखले यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button