पिंपरी चिंचवडआरोग्य
पिं-चिं पॅथॉलॉजिस्ट आणि मायक्रो बायोलॉजिस्ट संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ सातव
अध्यक्षपदी डॉ विजय सातव

पिंपरी(प्रतिनिधी) पिंपरी चिंचवड पॅथॉलिजिस्ट आणि मायक्रोबायोलॉजिस्ट या नव्याने स्थापन करण्यात आलेल्या संघटनेचा उदघाटन सोहळा आकुर्डी येथे पार पडला .संस्थापक अध्यक्ष डॉ विजय सातव, उपाध्यक्ष डॉ विकास मंडलेचा व सेक्रेटरी डॉ अमृतकर अष्टुरकर, खजिनदार डॉ शंकर गायकवाड,संचालक डॉ प्रज्ञा मुळे, डॉ महालक्ष्मी आर , डॉ मंगेश सगळे, डॉ किरण गोरे यांची निवड करण्यात आली .
उदघाटनप्रसंगी इंडियन मेडिकल असोशिएशन पिं-चिं भोसरीच्या अध्यक्षा डॉ माया भालेराव आणि डॉ डी वाय पाटील कॉलेजच्या विभाग प्रमुख डॉ चारुशीला गोरे, डॉ हरीश सरोदे, डॉ राजेश झोपे, वायसीएमचे डॉ नितीन मोकाशी, डॉ तुषार पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.