दुचाकीस्वारांचे शहरात सर्वाधिक अपघात – पीआय पिंजण
शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे रस्ते सुरक्षा जनजागृती फेरी

पिंपरी (प्रतिनिधी) ताथवडे येथील जे एस पी एमचे राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) यांच्याकडून रस्ते सुरक्षा रस्ते सुरक्षा सत्ता निमित्ताने भुमकर चौक वाकड ते डांगे चौक चिंचवड येथे रॅली काढण्यात आली रॅलीमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे जवळपास १२५ स्वयंसेवक उत्साहाने हातात रस्ते सुरक्षा संबंधीचे विविध फलक हातात घेऊन सहभागी झाले होते. सहभागी विद्यार्थ्यांनी हेल्मेट लावा अपघात टाळा, वेग आवरा जीवन सावरा, चार चाकी वाहन चालवताना बेल्टचा वापर करा, अति घाई संकटात नेई, सिग्नलचा नियम पाळा, वाहन चालवताना मोबाईल वापरू नका, पोलिसांना सहकार्य करा अशा विविध प्रकारच्या घोषणा विद्यार्थी देत होते.
या अनुषंगाने शाहू महाविद्यालयामध्ये वाकड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील पिंजण, उपनिरीक्षक हेमा साळुंखे, उपनिरीक्षक राजेंद्र जगताप, आणि कायदेतज्ञ अनिल आटोळे यांनी विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षा वाहतुकीचे नियम आणि नवीन कायदे याविषयी मार्गदर्शन केले. याविषयी बोलताना पोलीस निरीक्षक सुनील पिंजन म्हणाले की, सध्या पिंपरी चिंचवड परिसरामध्ये दुचाकीवरून होणाऱ्या अपघात वाढले असून हे अपघात वाहनांचा वेग जास्त असल्यामुळे होत आहेत असे दिसून येते. वाहन चालवताना दारू पिऊन वाहन चालू नये, दुचाकी वर बसणाऱ्यांनी हेल्मेट वापरावे असे आवाहन त्यांनी केले. सर्व जनतेने जर सार्वजनिक वाहतुकीचे नियम पाळले आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जर वापरली तर अपघाताचे प्रमाण फार कमी होऊ शकते.काही अघटीत घडत असेल तर नागरिकांनी 112 या क्रमांकावर पोलिसांशी संपर्क साधून त्यांना माहिती द्यावी असे आवाहन पोलीस निरीक्षक पिंजण यांनी केले.
यावेळी बोलताना कायदेतज्ञ अडव्होकेट अनिल आटोळे यांनी सांगितले की मित्रांच्या दबावामुळे किंवा मित्रांच्या संगतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये वाईट प्रवृत्ती वाढीस लागू शकतात म्हणून विद्यार्थ्यांनी चांगले मित्रांची संगत करावी. आपण व्हाट्सअप वर जर एखादी वाईट कॉमेंट केली तसेच एखाद्याकडे वाईट हेतूने एकटक बघणे हा पण गुन्हा होऊ शकतो. मुलींच्या बाबतीमध्ये गुड टच बॅड टच याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. याचबरोबर केंद्र शासनाने जुने नियम काढून जे नवीन नियम तयार केले आहेत त्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी संस्थेचे संचालक डॉ. संतोष भोसले, उपसंचालक डॉ. अविनाश देवस्थळी, उपसंचालक डॉ. अविनाश बडदे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे बोर्ड ऑफ स्टडीचे डॉ. एन एस मुजुमदार, अधिष्ठाता डॉ. प्रीती तोमर राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. बाळासाहेब गाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कु. अक्षता काजळे, हर्षवर्धन काजळे आणि त्यांचे सहकारी यांनी मोलाचे सहकार्य केले. सूत्रसंचालन कु. निर्मिती चौधरी या एनएसएसच्या विद्यार्थिनीने केले.
राष्ट्रीय सेवा योजना राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय यांनी राबवलेल्या या उपक्रमाचे कौतुक सर्वांनी केले.