पुरस्कारामुळे नवोदितांना मिळते प्रेरणा – पद्मश्री मुरलीकांत पेटकर
डॉ आशा पाचपांडे जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

चिंचवड (प्रतिनिधी): पिंपरी चिंचवड सन्मान सोहळ्यात शहरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. पुरस्कार विजेत्यांचे कौतुक करीत “अशा पुरस्कार सोहळ्यांमुळे नवोदितांना प्रेरणा मिळते आणि त्यांना पुढे जाण्यासाठी नवी उमेद मिळते.” असे मत पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांनी व्यक्त केले.न्यूज १४ नेटवर्कच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देवून गौरवण्यात आले
यावेळी ते बोलत होते.
यावेळी आयोजक अविनाश कांबीकर यांनी सांगितले की ज्यांनी आपल्या कर्तृत्वामुळे पिंपरी चिंचवड शहराचे नाव उज्वल केलेत अशा सर्व स्तरातील लोकांचा आम्ही नेहमी आदर करत आलो,त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी पिंपरी चिंचवड सन्मान सोहळा आयोजित केला आहे , हे यंदा चे दुसरे पर्व आहे. या सोहळ्यात कला, क्रीडा, शिक्षण, समाजसेवा, उद्योजकता आणि आरोग्य , सांस्कृतीक या क्षेत्रांतील मान्यवरांना त्यांच्या कार्यगौरवासाठी सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री मुरलीकांत पेटकर होते, प्रमुख पाहुणे आखिल भारतीय चित्रपच महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले ,जेजुरी देवस्थानचे मुख्य विश्वस्त अनिल सौंदडे , सामाजिक नेते मानव कांबळे , अभिनेते गणेश देशमुख , एएसएम ग्रुपच्या आशा पाचपांडे यांच्या सह शहरातील अनेक मान्यवरांनी या प्रसंगी उपस्थिती लावली.
यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रातील ११ जणांना सन्मान करण्यात येणार आला ,
१) मा.श्री सोपानराव खुडे -जेष्ठ साहित्यिक
२) मा.श्री. प्रविण तुपे – प्रशासकीय सांस्कृतिक
३) मा.श्री. बाळासाहेब गायकवाड- बांधकाम व्यावसायिक
४) मा.श्री. डॅा .प्रकाश कोयाडे – कांदबरी लेखक
५) मा.श्री मिलिंद कांबळे – पत्रकार
६) कु. प्रियंका इंगळे – (कॅप्टन- खो खो भारत )
७) मा. श्री. देवदत्त कशाळीकर- प्रसिद्ध फोटोग्राफर
८) मा. श्री. पंकज सोनवणे- VFX प्रोड्युसर
९) मा. श्री. वसंत गुजर – जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते
१०) डॉ आशा पांचपांडे – शैक्षणिक ( जीवनगौरव )
११) इंडो ऍथलेटिक्स सोसायटी – सामाजिक संस्था
पुरस्कार विजेत्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, अशा सन्मानामुळे त्यांच्या कामाची दखल घेतली जात आहे, आणि यामुळे समाजासाठी आणखी चांगले करण्याची प्रेरणा मिळते.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन तानाजी साठे तर आभार शिवाजी घोडे यांनी मानले