आरोग्यपिंपरी चिंचवड

६३ वर्षीय आजीच्या आतड्याची दुर्मिळ शस्त्रक्रिया

डॉ आग्रवाल यांच्या ओम रुग्णालयात यशस्वी प्रयत्न

भोसरी (प्रतिनिधी) भोसरी येथील ओम रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांनी ६३ वर्षीय आजीच्या पोटात वाढलेल्या अनावश्यक मांसाचा गोळा काढून प्राण वाचवले .
गंगुबाई बुधाजी आंबेकर ( वय ६३, दिघी ) असे या आजीचे नाव आहे.

आंबेकर यांना गेली वर्षभरा पासून जेवण पचत नव्हते. जेवल्यानंतर 10 मिनिटात खाल्लेले सर्व अन्नपदार्थ शरीराबाहेर उलटीद्वारे बाहेर टाकले जात होते.श्वास घ्यायला त्रास व्हायचा. वजन कमी होऊन शरीराने दुबळा बनले होते. त्यात आजीला रक्तदाब, शुगर, दोन वेळा हृदय रोगाचा झटका येऊन गेल्याने हृदयरोगाची शस्त्रक्रिया झालेली होती, अशा वेळी दुसरे ऑपरेशन करण्यासाठी किमान ३ ते ६ महिने थांबावे लागते. हे डॉक्टरांसमोर आव्हान होते. आंबेकर यांच्यावर या काळात डॉक्टरांनी औषधोपचार सुरु ठेवले.
दि ३ महिन्यापूर्वी आजीला त्यांच्या मुलाने ओम रुग्णालयात भरती केले. ओम रुग्णालयाचे संचालक डॉ अशोक अगरवाल यांनी तपासणी करून आजाराचे निदान केले. डॉ अशोक आगरवाल, डॉ रविंद्र शेळमोहकर, डॉ अर्चना शेळमोहकर, डॉ सागर बरोटे आणि त्यांच्या टीमने आजीवर दि १७ फेब्रवारी २०२५ रोजी गुंतागुंतीची व अवघड अशी शस्त्रक्रिया यशस्वी करून प्राण वाचवले.
आता आजीची प्रकृती स्थीर असून त्या पूर्वी सारखे अन्न ग्रहण करू शकतो.
यावेळी संजय आंबेकर ( मुलगा ) म्हणाले कि, माझ्या आईला पुण्यातील प्रख्यात अशा अशा रुग्णालयात दाखवले मात्र कुणीच उपचार करण्यासाठी भरती करून घेतले नाही. उपचार करू पण वाचेल कि नाही याची शाश्वती नाही. असे डॉक्टरांनी सांगितले.
अशा परिस्थितीत आमच्या नातेवाईक यांनी ओम हॉस्पिटलचे डॉ. आगरवाल यांची शिफारस केली.आज डॉ आगरवाल यांनी कमी खर्चात यशस्वी शस्त्रक्रिया करून आजीचा जीव वाचवला.अशा शब्दात समाधान व्यक्त केले.
डॉ आगरवाल म्हणाले कि, आजीचे पोटात एक मोठा मांसाचा गोळा होता तो नेमका कशाचा याचे निदान करून घेतले.सुरुवातीला कर्करोगाचा कि पाण्याचा गोळा यात शंका होती.वाढलेला मांसाचा गोळा शारीरिक यंत्रणेला अडथळा ठरत होता.आमच्या टीमने त्यांचा गोळा काढून त्यांना धोक्याबाहेर काढलेले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button