
चिखली (प्रतिनीधी) ‘राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त एस. एस. पी ग्रुप ऑफ इंस्टीट्यूट शिक्षण संस्थेच्या गणेश इंटरनॅशनल स्कूल चिखली येथे ‘ सायन्स अँड आर्ट एक्झिबिशन’ भरवण्यात आले होते . या प्रदर्शनाला प्रमुख पाहुणे म्हणून वैज्ञानिक डॉ. अंकिता नगरकर यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.
शाळेतील विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्टपणे प्रकल्पांची मांडणी केली होती. विज्ञानाचे सर्व प्रयोग विविध शाखांशी संबंधित होते. जसे की आण्विक मॉडेल्स, अंतराळ उपग्रह, डीसी मोटर्स, रेन वॉटर हार्वेस्टिंग, खडक, मातीचे ट्रान्सफॉर्मर, सौर यंत्रणा, मृदा संधारण, पाणी संधारण, रोबोट , चांद्रयान ३,पर्यावरण, पृथ्वीगोल इ. प्रदर्शनाला आलेल्या प्रमुख पाहुण्यांनी संपूर्ण सर्वेक्षण केले. प्रदर्शन आणि संबंधित विद्यार्थ्यांकडून त्यांच्या प्रत्येक प्रकल्पांबद्दल तपशील घेतला. त्याचबरोबर, प्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्या पालकांनीही या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला. शाळेतील विज्ञानाचे शिक्षक नयन पवार, श्रद्धा साळेगावकर,शोभा शेवाळे आणि प्रियंका ढवळे यांनी हे विज्ञान प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली. तसेच कला आणि हस्तकला वस्तूंचे देखील प्रदर्शन भरवण्यात आले होते. यामध्ये टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनवल्या होत्या. तसेच विद्यार्थ्यांनी अनेक प्रकारची चित्रे काढून वारली पेंटिंग, कॅनव्हास पेंटिंग, ग्लास पेंटिंग असे विविध प्रकारच्या आकर्षक कला प्रदर्शनात सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. यासाठी कलाशिक्षण विभागाच्या कोमल महिंदळकर यांनी विद्यार्थ्यांसाठी विशेष मेहनत घेतली.
कार्यक्रमाला संस्थेचे चेअरमन एस बी पाटील, विश्वस्त गणेश पाटील, स्नेहल पाटील, आकाश पाटील, मंगेश पाटील, पूजा पाटील, प्रशासकीय अधिकारी प्रकाश गायकवाड, सहयोगी संचालक सुनील शेवाळे, शाळेच्या मुख्याध्यापिका शिल्पा गायकवाड, पर्यवेक्षिका माधुरी येवले , क्रीडा पर्यवेक्षक विनोद जगदाळे, तसेच सर्व शिक्षकवृंद, पालक, विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.