सामाजिक
मळ्याळी बांधवांकडून आतंकवादी हल्ल्यातील पीडितांना आदरांजली
भक्ती शक्ती निगडीत निषेध सभा संपन्न

पिंपरी(प्रतिनिधी) वाग्देवता मल्याळम संस्थेच्या वतीने पहलगाम आतंकवादी हल्ल्यातील पीडितांना आदरांजली अर्पण करण्यात आली. भक्ती शक्ती उद्यान, निगडी येथे आयोजित करण्यात आला होता. प्रसिद्ध व्यवस्थापन सल्लागार व समाजसेवक अनिल अधी, तसेच भाजपचे कार्यकर्ते राकेश नायर, सपना वी. मारार, के. रंजीत, स्मिता अनिल मारार, के. अरविंदाक्षन नायर, संगीत नाम्बियार आणि वैष्णवी वी. मारार यांनी या कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त केले. वाग्देवतेची शपथ अर्पिता अनिल मारार यांनी उपस्थितांना वाचून दाखवली.
मेणबत्ती प्रज्वलित केल्यानंतर दोन मिनिटे शांतता पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. वेलायुधन पी. मारार यांनी पाहुण्यांचे स्वागत केले आणि हर्ष नायर यांनी आभार प्रदर्शन केले.