पहलगाम भ्याड हल्ला मानवतेला काळीमा- सुलभा उबाळे
शिवसेनेकडून चिंचवडमध्ये पहलगाम भ्याड हल्ल्याचा निषेध

–
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
शिवसेना पिंपरी चिंचवड शहराच्यावतीने चिंचवड येथील चापेकर स्मारकासमोर जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आला. ही घटना मानवतेला काळीमा फासणारी असल्याचे यावेळी शिवसेना उपनेत्या सुलभा उबाळे म्हणाल्या.
शिवसेना उपनेत्या सुलभा उबाळे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शहराच्या वतीने बुधवारी चिंचवड येथे क्रांतिवीर चापेकर स्मारकासमोर जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आला. यावेळी जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, संतोष सौंदनकर, शहर प्रमुख निलेश तरस, राजेंद्र तरस, माऊली जगताप, प्रशांत कडलक, ॲड. दिलीप पाटील, नारायण लांडगे, हरि नारायण डोंबाळे पाटील, दिलीप कुसाळकर, महादेव पाटील, शंकर गौडा पाटील, हेमचंद्र जावळे, सुदर्शन देसले ॲड. मुकुंद ओव्हाळ, केशव सरोदे, अनिल राऊत, अरुण कुमार डोईफोडे, शैला पाचपुते, शिल्पा आनपान, मीना डेरे प्रतिमा पांडे, सुनीता चांदणे, शारदा वाघमोडे, शैला पाटील, सायली साळवी, शीला भोंडवे, रितू कांबळे, सागर शिंदे, खंडूशेठ चिंचवडे, मंदार येळवंडे, प्रदीप मोरे, प्रदीप गुप्ता, रामेश्वर यादव, विश्वनाथ सिंग, सुरेंद्र प्रसाद, सुधीर आनपान आदी उपस्थित होते.
यावेळी सुलभा उबाळे म्हणाल्या, जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध आहे या भ्याड हल्ल्यात निष्पाप पर्यटकांचा बळी गेला, ही अतिशय वेदनादायक बाब आहे. या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील आमचे काही बांधव मृत्युमुखी पडले तर काही गंभीर जखमी आहेत. भारतीय सैन्याकडून दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिलं जाईल, याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.
…..