फेरीवाला हा स्वयं रोजगार निर्माण आणि अर्थव्यवस्थेचा घटक – शक्तिमान घोष
निगडीत आयोजित फेरीवाला राष्ट्रीय संमेलनात प्रतिपादन

पिंपरी दि. २८. – पिंपरी चिंचवड सह महाराष्ट्र आणि देशभरामध्ये मोठ्या संख्येने पथारी,हातगाडी,टपरी स्टॉल धारक असून देशभरामध्ये यांची संख्या ८ कोटीच्या जवळपास असून सध्याच्या स्थितीमध्ये शिक्षित, उच्चशिक्षितांना नोकरी मिळत नाही अशा शिस्तीमध्ये रोजगार निर्माण आणि अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग हा फेरीवाला असल्याचे प्रतिपादन नॅशनल हॉकर फेडरेशनचे राष्ट्रीय महासचिव शक्तिमान घोष यांनी व्यक्त केले.
नॅशनल हॉकर फेडरेशन,महाराष्ट्र हॉकर फेडरेशन, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे यमुनानगर निगडी येथे फेरीवाला फेरीवाला राष्ट्रीय संमेलनाचे संमेलन उत्साहात पार पाडले यावेळी ते बोलत होते. इतर राज्यातून आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचे स्वागत सामान्य फेरीवाल्यांनी उत्साहपूर्वक केले.
याप्रसंगी राष्ट्रीय महासचिव शक्तिमान घोष, महासंघाचे अध्यक्ष तथा कामगार नेते काशिनाथ नखाते, महिला राष्ट्रीय महासचिव अनिता दास, राष्ट्रीय संयोजक मेकॅनिक डाबरे, ओरिसाचे प्रताप साहू, मणिपूरच्या तम्मा दीदी, राजस्थानचे याकुब हुसेन, तेलंगणाचे एम एस अखिल, मध्य प्रदेशचे संजय भाई, दिल्लीचे जितेन बहादूर, पंजाबचे अनिल सिंह, नागपूरचे जम्मू आनंद,मुंबईचे अखिलेश गौड, महिलाअध्यक्षा वृषाली पाटणे, माधुरी जलमुलवार, समिती सदस्य किरण साडेकर,किसन भोसले,राजू बिराजदार, अलका रोकडे, अरुणा पाटील,सलीम डांगे, प्रल्हाद कांबळे, बालाजी लोखंडे,सुरज देशमाने,रुक्मिणी जाधव, युवराज निलवर्ण, राजेश माने,लाला राठोड ,नंदू आहेर, सलीम शेख,दत्ता जाधव, अंबादास जावळे, मनोज यादव, महेंद्र वाघमारे, समाधान जावळे आदीसह संख्येने मोठ्या संख्येने शहरातील पत विक्रेते उपस्थित होते.
दीप प्रज्वलन करून संमेलनाची सुरुवात झाली यावेळी फेरीवाला प्रमाणपत्र,ओळखपत्र ,नियुक्तीपत्र, त्याचबरोबर संत गाडगेबाबा स्वच्छ फेरीवाला अभियानांतर्गत प्रशिक्षण घेतलेल्यांना प्रमाणपत्र अन्न व औषध प्रशासनाचे प्रमाणपत्र चे वाटप करण्यात आले.
शक्तिमान घोष म्हणाले की देशभरातील विक्रेत्यांना आम्ही एकत्र करून ही मोट बांधली ही सबंध देशभरामध्ये एक मोठी ताकद निर्माण झालेली असून यातूनच केंद्र सरकारने कायदा केला त्या कायद्याच्या आम्लासाठी आम्ही विविध राज्यांमध्ये दौरे करत असून महाराष्ट्र राज्यामध्ये दिलासा देण्यासाठी आम्ही अशा प्रकारचे दौरे वारंवार करणार आहोत.
अनिता दास यांनी महिलांना एकत्रित येऊन लढा देण्याचे आवाहन करत महिला हॉकर्स योगदान मोठा असलेले चे नमूद केले.
जम्मू आनंद म्हणाले भारताचे संविधान श्रेष्ठ असून संविधानाने मिळालेला अधिकार हा महत्त्वाचा आहे संविधान वाचवण्यासाठी व संविधानाद्वारे मिळणारे हक्क अधिकार अबाधित ठेवण्यासाठी ही लढाई अधिक गतिमान करण्याची गरज आहे.