सामाजिक

ज्येष्ठ समाजसेवक डॉ अशोककुमार पगारिया यांची प्रांतीय जैन भवन समितीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड

आकुर्डी येथे झालेल्या कार्यक्रमात दिले निवडीचे पत्र

पिंपरी(प्रतिनिधी) दि, २३
पिंपरी चिंचवडमधील ज्येष्ठ समाजसेवक,ज्येष्ठ शिक्षण तज्ञ आणि श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स,नवी दिल्ली चे राष्ट्रीय अध्यक्ष अतुल जैन यांनी विद्यमान राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ अशोककुमार पगारिया यांची ” *हर प्रांत जैन भवन ” समिती* च्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी नियुक्ती केली.

तसेच नियुक्ती पत्र ही प्रा पगारिया यांना देण्यात आले.पंचम झोनच्या आकुर्डी येथे झालेल्या शपथविधीच्या कार्यक्रमांमध्ये राष्ट्रीय महामंत्री डॉ अमित राय जैन यांनी ही नियुक्ती ची घोषणा केली.डाॅ अशोककुमार पगारिया हे गेली २० वर्षांपासून जैन कॉन्फरन्स च्या अनेक पदांवर काम करीत आहेत,सध्या ते राष्ट्रीय उपाध्यक्ष होते आता वरील पदावर त्यांची नियुक्ती झाली असून जैन कॉन्फरन्स च्या तेरा प्रांतांमध्ये जैन भवन निर्माण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button