सामाजिक

रोटरी क्लब निगडीकडून ग्रामस्थांना रोलर ड्रमचे वाटप

आनंद कपूर प्रशिक्षण केंद्राला सौर प्रकल्प भेट

पिंपरी (प्रतिनिधी) रोटरी क्लब ऑफ निगडीच्या वतीने पाण्याची वाहतूक करण्यासाठी खरोशी, वाळद,आव्हाट (ता.खेड) या खेडयातील ग्रामस्थांना १०० रोलिंग ड्रमचे वितरण करण्यात आले. तसेच बोरघर (ता.आंबेगाव) येथील शाश्वत संस्थेच्या आनंद कपूर प्रशिक्षण केंद्रात बसविण्यात आलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन केले. आदिवासींसाठी हिरडा, मसाला प्रक्रिया केंद्र चालवले जाते. यांना वीज बील भरणे शक्य होत नसे. यामुळे रोटरी क्लबने सौर ऊर्जा प्रकल्प बसवून दिले.
यावेळी क्लबचे अध्यक्ष सुहास ढमाले, सेवा संचालक अश्विन कुलकर्णी,जयंत येवले, सोनाली जयंत, धनश्री कुलकर्णी, शाश्वत फाउंडेशनचे विश्वस्त सुरेश राजवाडे, अशोक आढाव, प्रतिभा तांबे, सुमंत सिंग, सुलाताई गवारी आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात रोलिंग ड्रम मिळाल्याने ग्रामस्थांना खूप आनंद झाला. हे ड्रम या ग्रामस्थांचे जीवन जगणे सोपे आणि आरामदायी बनवण्यात खूप मदत करतील,असा विश्वास अध्यक्ष श्री.ढमाले यांनी व्यक्त केला.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बोरघर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button