शाहू महाराज विद्यालयात संविधान दिन साजरा
शाहू महाराज शाळेत संविधान दिनानिमित्त विविध स्पर्धा

शाहू महाराज शाळेत संविधान दिनानिमित्त विविध स्पर्धा
चिखली (प्रतिनिधी ) शरद नगर येथील बोधिसत्व प्रतिष्ठान शिक्षण संस्था संचालित राजर्षी शाहू महाराज विद्यालयामध्ये आज संविधान दिन साजरा करण्यात आला.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बोधिसत्व प्रतिष्ठान शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गोकुळ गायकवाड यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून सचिव एल.एस. कांबळे, प्रमिथ फाउंडेशनचे योगेश गोरटे सामाजिक कार्यकर्ते पांडाभाऊ साने,स्त्री शक्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा अर्चना सोनार, पत्रकार शिवाजी घोडे, किशोर मराठे, सोमनाथ थोरात, मुख्याध्यापक बाबाजी शिंदे उपस्थित मान्यवर होते.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून प्रतिमापूजन करण्यात आले. यानंतर संस्थेचे अध्यक्ष गायकवाड यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी भाषण, गीत आणि शायरीच्या माध्यमातून भारतीय संविधानाची महती सांगितली. संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्ताने विद्यालयांमध्ये रांगोळी, चित्रकला, निबंध व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या.या स्पर्धांमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यालयातर्फे पारितोषिक देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी स्वाती पाटील, संतोष घरडे,सुजाता जोगदंड, कोमल गायकवाड, पुनम तारख, जितेंद्र सूर्यवंशी, किशोर बडे, व्होनमाने योगिता, अमोल सूर्यवंशी, प्रमोद रायकर, धुडकू कुवर, स्वप्निल पठारे यांनी विशेष परिश्रम घेतले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद डोंगरदिवे यांनी केले तसेच आभार रूपाली पवार यांनी मानले.