जीवन संजीवनी विषयक कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद
आयएमएचा पुढाकाराने बिर्ला रुग्णालयात कार्यक्रम

जीवन संजीवनी विषयक कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद
पिंपरी( प्रतिनिधी) इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पिंपरी चिंचवड भोसरी शाखा आणि आदित्य बिर्ला मेमोरिययल रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने संगणकीय प्रणालीद्वारे जीवन संजीवनी (सिपीआर सिम्यूलेशन) विषयक कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी आदित्य बिर्ला रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ नितीन महंतशेट्टी, असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ माया भालेराव,सचिव डॉ सारिका लोणकर, रुबी रुग्णालयाचे लाईफ सेविंग स्किल्सचे प्रशिक्षक डॉ राजेंद्र पाटील,असोसिएशनचे नियोजित अध्यक्ष डॉ. सुधीर भालेराव, डॉ सुमित लाड, डॉ संजय देवधर, डॉ संजीव दात्ये, आदी मान्यवर उपस्थित होते.थेरगाव येथील आदित्य बिर्ला रुग्णालयात आयोजित केलेल्या कार्यशाळेत सीपीआर बाबतीत माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
या कार्यशाळेत प्रख्यात भूलतज्ञ डॉ राजेंद्र पाटील यांनी सिम्युलेशन तंत्रज्ञानाद्वारे प्रशिक्षण दिले.तसेच डॉ जुई लागू, डॉ भावेश शेठ, डॉ शुभांगी कोठारी, डॉ सीमा सूर्यवंशी, डॉ सीमा वाळके,डॉ वर्षा कोयले,डॉ जितेंद्र वाघमारे, डॉ अदिती येलमार,डॉ मयुरी मोरे,डॉ सुप्रिया लंकेपिल्लेवार ,डॉ संगीता ठाकरे,डॉ अजितकुमार चौधरी, डॉ तुषार यादव, डॉ व्यंकटेश.. डॉ राजेश भदानी , डॉ निहार इंगळे, डॉ मिलिंद सोनवणे या तज्ज्ञ डॉक्टरांनी प्रशिक्षण दिले.
बदलत्या आहाराने, मधुमेह, उच्च रक्तदाब व हृदयाचे विकार यांनी बरेचदा अचानक हृदयाचा झटका येऊ शकतो.समुद्र किनारी किंवा रस्त्यावर दुर्घटना झालेल्या व्यक्तीला, हृदयविकाराच्या झटक्याने मूर्च्छित व्यक्तीला, शॉक लागलेल्या किंवा पाण्यात बुडालेल्या व्यक्तीला ताबडतोब वैद्यकीय उपचार मिळतीलच असे नाही.
तेथे रुग्णवाहिका येईपर्यंतचा वेळ अतिशय महत्वाचा असतो.अशा प्रसंगी समयसूचकता बाळगून जीवनसंजीवनी (बेसिक लाईफ सपोर्ट BLS) सारखे प्राथमिक उपचार व हॉस्पिटल मध्ये आधुनिक उपचार ( ACLS ) तातडीने मिळाले तर रुग्णाचा जीव वाचवू शकतो.
यासाठी आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये सर्व डॉक्टरांसाठी अत्यंत आधुनिक तंत्र व संगणक प्रणाली द्वारा कृत्रिम मानवी देहाची प्रतिकृती ( Mannikin) वर
प्रात्यक्षिके करून कार्यशाळेत प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी 100 हून जास्त डॉक्टर्स सहभागी झाले होते.
हृदय व श्वास बंद पडल्यास कसा सुरु करावा? कोणते लाईफ सेविंग ड्रुग्स वापरावे व गरज भासल्यास तातडीने उपचार कसे करावे? या विषयावर तज्ञांकडून मार्गदर्शन लाभले. अशी माहिती असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ माया भालेराव व चेअरमन डॉ सुमित लाड यांनी दिली.
कार्यशाळेचे सूत्रसंचालन डॉ मनीषा डोईफोडे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ सारिका लोणकर यांनी केले.