श्री 1008 चिंतामणी पार्श्वनाथ मूर्तीची पिंपरीत प्राणप्रतिष्ठापणा
दिगम्बर जैन एकता मंडळाचा पुढाकार

पिंपरी (प्रतिनिधी) उद्यम नगर येथील दिगम्बर जैन एकता मंडळाच्या वतीने मूलनायक श्री 1008 चिंतामणी पार्श्वनाथ तीर्थणकारांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा मोठया उत्साहात करण्यात आली.
श्री 1008 अमोघकिर्ती महाराज, श्री 1008 अमरकिर्ती महाराज, कोल्हापूर येथील संस्थान मठाचे प.पू श्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्या सान्नीध्यात हा सोहळा पार पडला.
श्री 1008 चिंतामणी पार्श्वनाथ तीर्थणकर मूर्तीचे पंच कल्याण प्रतिष्ठा महा महोत्सव सांगता प्रसंगी “भगवान पार्श्वनाथ यांचा मोक्ष कल्याणक संस्कार “या विषयावर त्यांनी प्रवचन दिले.
यावेळी अमोघकिर्ती महाराज यांनी स्वार्थापासून ते मुक्ती पर्यंतचा प्रवास उदाहरणे देवून सांगितले.
अमरकिर्ती महाराजांनी जिन दर्शन नित्यानेमाने केले पाहिजेत असे सांगितले.
लक्ष्मीसेन भट्टारक यांनी युवकांना शिक्षणासोबतच धार्मिक ज्ञान आत्मसात केले पाहिजेत. जैन धर्माचे पालन करून रात्री आहार वर्ज्य करण्याचा सल्ला दिला. मंदिरात विराजमान झालेल्या पार्श्वनाथ मूर्ती ही प्राचीन असल्याने त्यांचे हे वैशिष्ट्य सांगितले.
यावेळी सर्व समिती सदस्यांनी भट्टारक लक्ष्मीसेन यांचे पाद्य प्रक्षालन केले. विविध क्षेत्रतातील मान्यवरांचा सत्कार संपन्न झाले.
यावेळी अध्यक्ष डॉ विलास लोहाडे, उपाध्यक्ष किरण कोळेकर, सचिव अनंत दोशी, सहसचिव संकेत शहा, खजिनदार विजय कमते, सहखजिनदार शांतीनाथ मगदूम, सुनील मंगूडकर, अविनाश चौगुले, आदी उपस्थित होते.
सूत्रसंचालन दिपक उपाध्याय तर आभार शीतल दोशी यांनी मानले.