पिंपरी चिंचवडसामाजिक

प्रत्येकाने स्वतः मधील सामर्थ्य ओळखले पाहिजेत- श्री 1008 अमोघकीर्ती महाराज

मूर्ती प्राण प्रतिष्ठापणा महोत्सवात मान्यवरांचा गौरव

पिंपरी (प्रतिनिधी) प्रत्येक व्यक्तिमध्ये देव बनण्याची क्षमता आहे. मात्र ते जोपर्यंत स्वतः मध्ये असलेले सामर्थ्यांची जाण नसते. जोपर्यंत स्वतः मधील भगवानची ओळख होणार नाही. तोपर्यत आपण मानव सर्व सामान्य नागरिकच असाल. यासाठी आपल्या स्वतःमधील सामर्थ्य ओळखा. असे उदगार परमपूज्य श्री 1008 अमोघकीर्ती महाराज यांनी काढले.

पिंपरी येथील (मासूळकर कॉलनी) दिगम्बर जैन एकता मंडळाच्या वतीने आयोजित मुलनायक श्री 1008 चिंतामणी पार्श्वनाथ तीर्थणकर मूर्तीचे पंच कल्याण प्रतिष्ठा महा महोत्सवाचे आयोजन केले होते. यावेळी बोलत ते होते.
यावेळी अध्यक्ष डॉ विलास लोहाडे, उपाध्यक्ष किरण कोळेकर, सचिव अनंत दोशी, सह सचिव संकेत शहा, खजिनदार विजय कमते, सहखजिनदार शान्तिनाथ मगदूम आदी उपस्थित होते.सकाळच्या दरम्यान उद्यमनगर, मासूळकर कॉलनी परिसरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.
तसेच दुसऱ्या दिवशी (दि. 4 रोजी) समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीचा गौरव प.पू 1008 अमोघकीर्तीजी महाराज आणि प.पू 1008 अमरकीर्ती महाराज यांच्या सान्नीध्यात करण्यात आला.
उद्यमनगर येथील दिगंबर जैन एकता मंडळास 1008 चिंतामणी पार्श्वनाथ तीर्थकर यांचे मंदिर उभारणीसाठी भुदान करणाऱ्या गीता तीलवाणी यांना मानपत्र देवून विशेष सन्मान करण्यात आला.
तसेच सुजाता शहा,शीतल दोशी, सुरेंद्र गांधी यांचा सामाजिक कार्यातील योगदानाबाबद्दल विशेष सन्मान केला. त्याच बरोबर श्री 1008अमोघकीर्ती महाराजांचे पूर्वाश्रमिचे माता पीता सौ.जनकमाला आणि अरविंद जैन, श्री 1008 सुलक्षणसागर महाराजांचे पूर्वश्रमिचे सुपुत्र डॉ. विलास लोहाडे, श्री 1008 स्वभावसागर महाराज यांच्या पूर्वश्रमिच्या धर्मपत्नी दयाबाई कुंदप यांचा खास गौरव करण्यात आला. हा कार्यक्रम दि.7 पर्यत सुरु राहणार आहे.

फोटो ओळ – डावीकडून नाझीरकर, देवेगौडा पाटील, प्रकाश… सुनील मंगूडकर, शिवाजी कांते,गीता तिलवानी, मयूर तिलवानी, शशिकला दोडामणी, अनंत दोशी, विजय कमते, अविनाश चौगुले, संकेत शहा, कलाप्पा सनकी आदी…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button