सामाजिकपुणे

सयाजी महाराजांचा इतिहास दुर्लक्षितच – बाबा भांड

बदोडे मंडळाकडून सयाजी गायकवाड महाराजांची जयंती

सयाजी महाराजांचा इतिहास दुर्लक्षित राहिला- भांड

बडोदे मंडळाकडून सयाजी महाराजांची जयंती साजरी

औंध (प्रतिनिधी) ज्या राजाने -शाहू- फुले- आंबेडकर याच्यासह पुण्यातील ६२ संस्था,प्रज्ञावंत, क्रांतिवीर, समाजसुधारक,अशा अनेक युगपुरुष आणि गरजू विद्यार्थी यांना तब्बल ८९कोटीहून अधिक रुपयांची मदत केली.ज्या राजाचे कार्य डोंगरावढे आहे. जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ७ व्या क्रमांकांवर असलेले, डोंगरावढे कार्य असणारे महाराज सयाजी गायकवाड यांचा इतिहास जनतेसमोरे आला नाही. अशी खंत ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड यांनी व्यक्त केली.
बडोदे मित्र मंडळाच्या वतीने महाराजा सयाजी गायकवाड यांची औंध येथील सयाजीराव गायकवाड सभागृहात जयंती साजरी करण्यात आली . यावेळी ते बोलत होते.
सयाजी गायकवाड यांचे पणतू सायजीराव गायकवाड, माजी महापौर दत्तात्रय गायकवाड,श्रीनिवास सोलापूरकर, महेंद्रसिंग गायकवाड, राजेंद्र हरपाळे, नागेश चव्हाण, राजेंद्र दिंडोरकर, बडोदे मित्र मंडळाचे अध्यक्ष डॉ जयसिंग पाटील, उपाध्यक्ष अतुल शहा,कमांडर निलेश दिघावकर, विश्वस्त प्रभाकर जोशी, नितीन पारिख,मेघाताई गोडबोले आदी मान्यवर उवस्थित होते.

श्री भांड पुढे म्हणाले कि, सयाजी गायकवाड यांनी स्वतःपासून काटकसर, आर्थिक नियोजन करून राज्य प्रबळ बनविले. लक्ष्मी आणि सरस्वती एकत्र गुण्यागोविंदाने नांदवून जगातले सातव्या क्रमांकाचे श्रीमंत राजा साहित्य, कला, संस्कृती अन् गरजवंतांचे आश्रयदाते झाले.
सयाजी महाराज यांनी त्या काळात पितामह नौरोजी, जमशेट टाटा, नामदार गोखले, लो. टिळक, म. गांधी, न्या. रानडे, म. फुले, राजर्षी शाहू, पं. मालवीय, डॉ. आंबेडकर, रवींद्रनाथ टागोर, स्वा. सावरकर, कर्मवीर भाऊराव, महर्षी शिंदे या समाजासाठी योगदान देणारे या महापुरुषांना आर्थिक मदत केली.

स्वातंत्र्यलढ्याचे पाठीराखे असलेले सयाजीराव हे सार्वभौम राजा होते. ७५०० ग्रंथ प्रकाशित करणारे भारतीय साहित्याचे निर्माते असलेले सयाजीराव लेखक-प्रकाशकांचे पोशिंदे होते.
त्यांनी शिक्षण-विज्ञान हेच प्रगती-परिवर्तनाचे साधन आहे हे ओळखून त्यांनी प्रथमच सक्तीचे प्राथमिक मोफत शिक्षण, सुप्रशासन-न्याय, शेती-उद्योगांना मदत, सामाजिक-धार्मिक सुधारणा, जाती-धर्मांतील भेद दूर करून समता, मानवता अन् सर्वधर्मसमभावाचा मार्ग निवडला.असे ते शेवट म्हणाले.
माजी महापौर गायकवाड यांनी औंध ची इतिहासासोबत नाळ जोडलेली आहे याची माहिती दिली. डॉ सोलापूरकर यांनी ऐतिहासिक वास्तूंची माहिती दिली.
अध्यक्ष डॉ जयसिंग पाटील यांनी प्रास्ताविक भाषणातून बदोडे मित्र मंडळाची माहिती सांगत जयंती साजरी करण्याचा हेतू सांगितला.
सूत्रसंचालन गायत्री जाधवराव यांनी तर आभार अच्युत यार्दी यांनी मानले.

फोटो ओळ डावीकडून

निलेश दीगांवकर, अतुल शाह,अच्युत यार्दी, डॉ जयसिंग पाटील, सयाजीराव गायकवाड – लाईफ मेंबर, दत्तात्रय गायकवाड,लेखक बाबासाहेब भांड, श्रीनिवास सोलापूरकर, नागेश चव्हाण

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button