शैक्षणिक

विद्यापीठाच्या तदर्थ अभ्यास मंडळ अध्यक्षपदी डॉ. राय यांची फेरनिवड

सलग दुसऱ्यांदा अध्यक्ष होण्याचा बहुमान

पिंपरी(प्रतिनिधी) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेंतर्गत बीएससी हॉस्पिटॅलिटी स्टडीज या तदर्थ अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. अजयकुमार राय यांची फेरनिवड करण्यात आली.
डॉ. राय हे गेली 20 वर्षांपासून चिंचवड येथील डॉ. अरविंद तेलंग इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटमध्ये प्राचार्य म्हणून कार्यरत आहे. विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेअंतर्गत येणाऱ्या तदर्थ अभ्यास मंडळावर अध्यक्ष म्हणून सदर पत्र निर्गमित झालेल्या तारखेपासून दोन वर्षांकरिता नियुक्ती केलेली आहे. विद्यापीठाचे कुलगरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या आदेशावरून उप कुलसचिव डॉ स.द डावखर नियुक्तीचे पत्र दिले आहे. या नियुक्तीबद्दल कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष वालचंद संचेती यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी राय यांचे अभिनंदन केले आहे. विद्यापीठाच्या नियमानुसार डॉ. राय हे लवकरच सहा सदस्यांची समिती गठीत करतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button