प्रा. स्मिता सदार यांचा “उत्कृष्ट प्राध्यापिका” पुरस्काराने गौरव
प्रा सदार यांचे शैक्षणिक क्षेत्रात भरीव कार्य

आकुर्डी स्थित डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या फार्माकोलॉजी विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका डॉ. स्मिता सदार यांना त्यांच्या संशोधनातील उत्कृष्ट कामगिरीसाठी महाविद्यालयातर्फे दिला जाणाऱा “उत्कृष्ट प्राध्यापिका” पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. हा पुरस्कार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. पराग काळकर यांच्या हस्ते प्रथम वर्ष विद्यार्थी स्वागत समारंभा दरम्यान प्रदान करण्यात आला. प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह आणि रु. 5000 रोख बक्षीस असे पुरस्काराचे स्वरूप होते.
प्रा. डॉ. स्मिता सदार यांना दहा वर्षांहून अधिक संशोधनाचा अनुभव असून त्यांच्या २५ हून अधिक शोधनिबंधाचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रकाशन झाले आहे. जठर आणि आतड्याच्या रोगांवरील औषध नियोजनावर त्यांनी संशोधन केले असून त्यांच्या नावावर तीन पेटंट, तीन पुस्तके आहेत. तसेच त्यांनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये पोस्टर आणि ओरल प्रेझेंटेशन केलेले आहे.
या पुरस्कारासाठी संस्थेचे संकुल संचालक रियर ॲडमिरल अमित विक्रम (नि.) आणि प्राचार्य डॉ. निरज व्यवहारे यांनी प्रा. डॉ. स्मिता सदार यांचे अभिनंदन केले.