शैक्षणिक

सीए बनण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे” – सीए केतन सायया

सीए इन्स्टिट्यूटच्या वतीने ज्येष्ठ सीएंचा गौरव

निगडी (प्रतिनिधी): “सीए बनणे अवघड आहे” अशी नकारात्मक प्रतिमा समाजात रूढ झाली आहे. मात्र, सीए कोर्स हा एकमेव असा कोर्स आहे जो अत्यंत कमी खर्चात करता येतो आणि त्यातून समाजात मान-सन्मान व उत्तम आर्थिक स्थैर्य मिळवता येते. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना या कोर्सकडे प्रोत्साहित करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन आयसीएआयच्या पश्चिम विभागाचे अध्यक्ष सीए केतन सायया यांनी निगडी येथे केले.
दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंट्स ऑफ इंडियाच्या पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने निगडी येथे आयोजित महाविद्यालयीन प्रतिनिधींसोबतच्या चर्चासत्र आणि अकौंटन्सी म्युझियमचे उदघाटन करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.

यावेळी सीए इन्स्टिट्यूट पिं चिं शाखाध्यक्ष सीए वैभव मोदी यांनी जास्तीत जास्त सीए घडविण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.यासाठी समाजातील तरुणांनी पुढे यावे. असे आवाहन केले.
सामाजिक क्षेत्रातील योगदानासाठी अशोक पगारिया, के एल बन्सल, महेश्वर मराठे, दत्तात्रय खुणे, अरविंद भोसले, पंकज सुराणा तसेच इन्स्टिट्यूट साठी योगदान देणारे ज्येष्ठ सीए रामेश्वर जाजू, सीए कुंतिलाल शिंगी, सीए दिलीप कटारे, सीए नंदकिशोर लाहोटी यांचा विशेष गौरव करण्यात आला.

कार्यक्रमास पश्चिम विभाग अध्यक्ष सीए केतन सायया,
खजिनदार सीए फेनील शहा,नियोजित सदस्य सीए राजेश अग्रवाल,रिजनल कौन्सिल सदस्य सीए रेखा धामणकर, सीए अभिषेक धामणे,पिंपरी चिंचवड शाखा अध्यक्ष सीए वैभव मोदी, उपाध्यक्ष सीए सारिका चोरडिया,सचिव सीए मनोज मालपाणी, खजिनदार सीए महावीर कोठारी, विकासा अध्यक्ष सीए धीरज बलदोटा, कार्यकारी सदस्य सीए सचिन ढेरंगे, सीए शैलेश बोरे,माजी अध्यक्ष सीए संतोष संचेती,सीए पंकज पाटणी, सीए सचिन बन्सल,सीए अभिषेक धामणे आदी मान्यवर उपस्थित होते.

फोटो ओळ:
डावीकडून – अभिषेक धामणे, राजेश आग्रवाल, केतन सैया, सारिका चोरडिया, सत्कार स्वीकारताना डॉ दत्तात्रय खुणे,फेनील शहा, वैभव मोदी, रेखा धामणकर आदी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button