सोशल मीडियापेक्षा ग्रंथालयात वेळ घालवल्यास भविष्य उज्वल – प्र कुलगुरू डॉ. पराग काळकर
डॉ.डी.वाय.पाटील फार्मसी महाविद्यालयामध्ये स्वागत समारंभ
पिंपरी (प्रतिनिधी) नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून आयुष्यात अपग्रेड आणि अपडेट राहावे लागणार आहे. हल्ली विद्यार्थी बराच काळ समाज माध्यमावर वेळ वाया घालवत आहे . पण हाच अमूल्य वेळ जर अभ्यास करण्यासाठी ग्रंथालयात घालवल्यास भविष्य उज्वल होईल. असा विश्वास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.पराग काळकर यांनी व्यक्त केला.
आकुर्डी येथील डॉ. डी.वाय.पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या वतीने प्रथम वर्ष डी. फार्मसी, बी. फार्मसी, एम. फार्मसी आणि डॉक्टर ऑफ फार्मसी विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते.
यावेळी डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुलाचे संचालक रियर ऍडमिरल (नि) अमित विक्रम, प्राचार्य डॉ. निरज व्यवहारे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर श्रीमती जस्मिता कौर, उपप्राचार्य डॉ. शिल्पा चौधरी, समुपदेशक श्रीमती श्रुति शेठ, प्रा. सारिका निकम, सुनीता भट्टाचार्य आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. काळकर पुढे ते म्हणाले कि, कृत्रिम बुद्धिमत्ता (ए.आय) तंत्रज्ञान आपली नोकरी खेचून घेईन, असे भीती बाळगणारेच ए.आयचा सर्रास वापर करतात.
आजचे युग हे संगणक इंटरनेट व समाज माध्यमांची युग आहे व त्याचा सरास वापर होताना दिसत आहे विद्यार्थी वर्गामध्ये सुद्धा सोशल मीडियाचा वापर प्रमाणापेक्षा अधिक वाढत आहे व सोशल मीडिया म्हणजे ज्ञान मिळवण्याचे साधन आहे,असा एक गैरसमज सर्वच विद्यार्थ्यांमध्ये दिसून येत आहे.परंतु समाज माध्यमे हे लक्ष विचलित करणारे व वेळेचा अपव्यय करणारे ठरू लागलेले आहे. हा वेळ ग्रंथालयामध्ये जर घालविला व त्याद्वारे ज्ञानार्जन होईल तसेच अधिकाधिक सक्षम विद्यार्थी तयार होतील. आजची पिढी मानसिक आरोग्य संबंधित तक्रारींबाबत अधिक संवेदनशील होत असताना दिसत आहे,आणि हाच खरा देशापुढील प्रश्न आहे. त्यासाठी शिक्षक पालक समुपदेशक या सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे असेही त्यांनी यावेळी नमूद केले
यशस्वी होण्यासाठी आणि जागतिक पातळीवर आपले स्थान बनविण्यासाठी सातत्य आणि कौशल्य हे खूप महत्वाचे असून त्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःला नेहमी प्रोत्साहित करून संवाद कौशल्य विकसित केले पाहिजेत.
यावेळी डॉ. डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुलाचे संचालक रियर ॲडमिरल अमित विक्रम (नि.) यांनी विद्यार्थी आणि पालकांना संकुला बद्दलची संपूर्ण माहिती दिली व संस्थेच्या या औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात प्रवेश घेतल्याबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
प्राचार्य डॉ. व्यवहारे म्हणाले कि,समाजाला निरोगी ठेवण्याची जबाबदारी फार्मासिस्टवर आहे.
औषध निर्मिती क्षेत्रामध्ये देश अग्रेसर आहे हे कोरोना काळात लस जगाला दिली यावरून सिद्ध होते. आज औषधनिर्माण उद्योग क्षेत्र 42 हजार कोटींचा बाजार आहे. तुम्ही जर फार्मसीचा कोर्स निवडला ही कौतुकास्पद बाब आहे. विद्यार्थी जडण घडणीमध्ये शिक्षक आणि पालक यांच्या दोघांची जबाबदारी आहे. अभ्यासा सोबत कार्यानुभव आणि संभाषण यातूनही शिकता येते असे सांगितले.
आरोग्य सेवा प्रणालीमध्ये फार्मासिस्ट च्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित करताना परिपूर्ण फार्मासिस्ट बनविण्यासाठी महाविद्यालय विद्यार्थांना सर्वतोपरी मदत करते असे प्रतिपादन केले.
प्रा. जस्मिता कौर यांनी विद्यार्थ्यांचे करियर घडविण्यामध्ये महाविद्यालय नेहमी प्रयत्नशील असते असे सांगून जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी औषध उद्योगाला अपेक्षित असे कलाकौशल्य आत्मसात करण्यासाठी विद्यार्थांना पुरेपूर सहाय्य करतो, असे सांगितले.
समुपदेशक श्रुती शेठ यांनी विद्यार्थांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याबाबत मार्गदर्शन केले.
सॉफ्ट स्किल प्रशिक्षक सुनीता भट्टाचार्य यांनी करिअर घडविण्यामध्ये सॉफ्ट स्किलची महत्त्वाची भूमिका आहे. असे सांगितले.
उप-प्राचार्या डॉ. शिल्पा चौधरी यांनी ओळख कार्यक्रमाचा उद्देश आणि शैक्षणिक *नियमाबद्दल माहिती दिली. “अमली पदार्थांचे सेवन आणि त्याचे दुष्परिणाम” या विषयावरील टेक्निकल मॅगझिनचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
२०२३-२४ या शैक्षणिक वर्षात प्रथम आणि द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना सुवर्ण आणि रजत पदके देवून गौरवन्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कार्यक्रम समन्वयक डॉ. सारिका निकम, प्रा. काजल भगत आणि प्रा. गायत्री पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी श्रीकांत नाईक आणि कु. श्रेयशी देशमुख यांनी केले तर आभार कु. भूमिका झाडे हिने मानले.