शैक्षणिक

एआयसीटी डिझाईन अकॅडमीच्या तनिशा हाडोळेची अभूतपूर्व कामगिरी

जेईई मेन बी आर्किटेक्चर 99.95 गुण मिळवून यश संपादन

पिंपरी (प्रतिनिधी) : एआयसीटी डिझाईन अकादमी ची विद्यार्थिनी तनिशा हाडोळे हिने जेईई मेन B.Arch (जानेवारी 2025) परीक्षेत 99.95 गुण मिळवून अभिमानास्पद यश संपादन केले आहे. तिच्या या उत्तुंग यशामुळे संस्थेच्या गुणवत्तापूर्ण मार्गदर्शनाची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल लीना सप्रा, वास्तू विशारद अपर्णा शिंदे, शिवानी सुर्वे, रवी सर आणि एआयसीटी डिझाईन अकादमीच्या संपूर्ण स्टाफने तिचे अभिनंदन केले.

*एआयसीटी डिझाईन अकॅडमी आर्किटेक्चर क्षेत्रातील नामांकित प्रशिक्षण संस्था आहे.
एआयसीटी डिझाईन अकॅडमी ही नाटा आणि जेईई मेन वास्तू विशारद परीक्षेसाठी सर्वोत्तम मार्गदर्शन करणारी अग्रगण्य संस्था आहे. 11वी आणि 12वी PCM विद्यार्थ्यांसाठी विशेष अभ्यासक्रम, उत्कृष्ट प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधांमुळे ही संस्था देशातील टॉप आर्किटेक्चर प्रशिक्षण संस्थांपैकी एक म्हणून ओळखली जाते.

संस्थेचे संचालक राजेश सप्रा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की,जेईई मेन बॅचलर ऑफ आर्किटेक्चर (B.Arch) ची दुसरी संधी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात असेल नाटा परीक्षा मार्च ते जून 2025 दरम्यान होणार आहे
विद्यार्थ्यांनी वेळेचे योग्य नियोजन करून अभ्यास करावा आणि स्मार्ट स्ट्रॅटेजी वापरावी.
“यशस्वी होण्यासाठी फोकस, मेहनत आणि योग्य मार्गदर्शन हे अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. सातत्याने सराव करा आणि परीक्षेच्या तयारीत कोणतीही कमतरता राहू देऊ नका. तुमच्या स्वप्नातील कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी एआयसीटी डिझाईन अकॅडमी तुमच्यासोबत आहे.
अधिक माहितीसाठी AICT डिझाईन अकादमी ला भेट द्या आणि तुमच्या उज्ज्वल करिअरसाठी पहिलं पाऊल उचलाः

🌐 वेबसाईट: aictdesign.in

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button