
पिंपरी(प्रतिनिधी) निगडी यमुना नगर येथील शेख बाबा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने निगडी परिसरातील सुमारे दोनशे सर्व जाती धर्मातील गरजू महिलांना अन्नधान्याचे वाटप करून एक मदतीचा हात दिला आहे.
यावेळी माजी नगरसेवक दत्ता पवळे,सचिन चिखले,मौ. ईश्तीयाक शेख , मौ. मुशर्फ शेख,रमणलाल बाकलीवाल,दादा सोनवणे उत्तम काळभोर, दीनाभाई कनादिया, अहमद शेख, सविता पॉल, ट्रस्टचे अध्यक्ष बाबा आलम शेख आदी मान्यवर उवस्थित होते.
यावेळी निगडी, यमुना नगर,ओटास्कीम, त्रिवेणी नगर, रुपीनगर या परिसरातील गरजू महिलांना जीवनाश्यक वस्तू वाटप करण्यात आले.
सूत्रसंचालन आदिकेत वाघमारे यांनी तर आभार समीर शेख यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हुसैन जमादार, सोहेल शेख, मनोज शेलार यांनी विशेष परिश्रम घेतले.