क्रिडापिंपरी चिंचवड

एमआयडीसी प्रीमियर लीगमध्ये प्रगती वॉरियर्सला विजेतेपद तर सह्याद्रीला उपविजेतेपद

चाकण एमआयडीसी उद्योजक संघटनेचा पुढाकार

पिंपरी (प्रतिनिधी ) चाकण एमआयडीसी उद्योजक संघटनेच्या वतीने चिखली येथे घेण्यात आलेल्या एमपीएल क्रिकेट स्पर्धेत प्रगती वॉरियर्स संघाने विजेतेपद तर सह्याद्री आंत्रप्रेन्यूअर्स संघाने उपविजेतेपद पटकावले.

बक्षीस वितरण सोहळ्यासाठी कामगार नेते यशवंत भोसले, बी एन आय पिंपरी चिंचवडचे संचालक देवानंद देशमुख, नेत्रा सेल्सचे संचालक नितीन खाटेकर, उद्योजक कौस्तुभ मुरुडवार व अजय मुंगडे तसेच शेकडो उद्योजक उपस्थित होते.

अतिशय चुरशीच्या झालेल्या या संपुर्ण क्रिकेट स्पर्धेमध्ये उद्योजक लक्ष्मण काळे यांच्या प्रगती वॉरियर्स संघाने विजेतेपद पटकावले. उद्योजक जयदेव अक्कलकोटे यांच्या सह्याद्री आंत्रप्रीन्युअर्स यांना उपविजेते पद मिळाले व उद्योजक विश्वास निकत यांच्या पी व्ही एन लिजंड्स संघाला तिसऱ्या स्थानावरती समाधान मानावे लागले.
यावेळी जयदेव अक्कलकोटे यांनी २८ चेंडूत ९६ धावा काढल्या. तसेच 6 चेंडूवर सलग 6 षटकार मारत रोमहर्षक कामगिरी केली. यामुळे खेळाला निर्णायक वळण मिळाले.
मॅन ॲाफ दी सिरीज – जगदीश रेड्डी
बेस्ट बॅट्समन – जयदेव अक्कलकोटे
बेस्ट बॅालर – वेदांत मामिदवार
बेस्ट फिल्डर – विश्वास निकत

चाकण एमआयडीसी उद्योजक संघटनेचे अध्यक्ष जयदेव अक्कलकोटे व त्यांच्या उद्योजक संघटनेतील ऊद्योजकांनी ५ वर्षापूर्वी कंपनीचे मालक व त्यामधील कामगार यांच्यामधील दरी कमी करण्यासाठी क्रिकेट या खेळाचे माध्यम तयार करून भव्य अशी एम पी एल क्रिकेट स्पर्धा सुरू केली. यामध्ये आत्तापर्यंत कंपन्यांच्या शेकडो कामगारांनी सहभाग घेतला होता.

यावेळी चाकण एमआयडीसी उद्योजक संघटनेचे अध्यक्ष जयदेव अक्कलकोटे म्हणाले की,
यावर्षी प्रथमच फक्त कंपन्यांचे मालक यांना एकत्र घेऊन भव्य असे एम पी एल क्रिकेट स्पर्धा 2025 सीजन 5 हे चाकण भोसरी एमआयडीसी उद्योजक संघटनेने आयोजित केली होती. यामध्ये 100 पेक्षा जास्त उद्योजकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेसाठी एम पी एल कोअर कमिटीचे प्रमुख जयदेव अक्कलकोटे, मुख्य समन्वयक सीए ऋषी खळदकर, उद्योजक निखिल देशमुख, चाकण एमआयडीसी उद्योजक संघटनेचे संचालक प्रवीण शिंदे,प्रशांत गोरे, सचिव निवास माने, खजिनदार किसन गायकवाड, उद्योजक पंकज ढवळे, सिद्धार्थ राणे, सुभाष गोळे आदींनी यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले .
या स्पर्धेकरिता अभिजीत प्लास्टिक प्रायव्हेट लिमिटेड, बी एन आय पिंपरी चिंचवड, नेत्रा सेल्स अँड सर्व्हिस, कौस्तुभ एंटरप्राइजेस व टूलकॅान सिस्टीम यांचे प्रायोजकत्व लाभले.
29 व 30 जानेवारी 2025 रोजी चाललेल्या या स्पर्धा सिल्वर क्रिकेट अकॅडमी स्टेडियम चिखली येथे पार पडल्या.
या स्पर्धेसाठी उद्योजकांना एकत्र घेऊन त्यांचे संघ तयार करण्यासाठी जवळपास 2 महिने दर गुरुवारी प्रत्येक उद्योजकाचा खेळ बघून त्याचे ग्रेडिंग करण्यात आले व त्यानंतर प्रत्येक संघामध्ये त्याच तोडीचे उद्योजक खेळाडू हे देण्यात आले त्यामुळे सहभागी सर्व संघ हे समतुल्य होते.

पुढच्या वर्षी देखील यापेक्षा भव्य दिव्य अशी एम पी एल क्रिकेट स्पर्धा भरून जास्तीत जास्त कंपन्यांच्या मालकांना खेळाच्या माध्यमातून एकत्र आणून उद्योजकता विकास साधण्याचा प्रयत्न राहील. असे ते शेवटी म्हणाले.

फोटो १) प्रगती वॉरियर क्रिकेट संघ बक्षीस घेताना
२) सह्याद्री आंत्रप्रेन्यूअर्स क्रिकेट संघ बक्षीस स्वीकारताना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button