डॉ पी मालती यांना उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार प्रदान
एआयसीटीईचे अध्यक्ष सीताराम यांच्या हस्ते सन्मान

आकुर्डी येथील डी वाय पाटील शैक्षणिक संकुलातील डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पी. मालती यांना इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन, नवी दिल्ली या संस्थेचा राष्ट्रीय स्तरावरील “सर्वोत्कृष्ट प्राचार्य” हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
डॉ. पी मालती यांना चंदीगड येथील लेमरीन टेक स्किल युनिव्हर्सिटी येथे संपन्न झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात अखिल भारतीय तंत्र शिक्षण मंडळाचे (AICTE) चेअरमन डॉ टी जी सीताराम यांच्या शुभहस्ते पुरस्कार देण्यात आला.
याप्रसंगी इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन, नवी दिल्ली चे अध्यक्ष डॉ प्रतापसिंह देसाई, डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन मुंबईचे प्रमुख डॉ विनोद मोहितकर, लेमरीन टेक स्किल युनिव्हर्सिटीचे कुलपति डॉ. संदीपसिंग कुरा, महाविद्यालयाच्या IQAC सेल चे प्रमुख डॉ. विनय कुलकर्णी, सिविल इंजीनियरिंग डिपार्टमेंटचे विभाग प्रमुख डॉ. अशोक मोरे, प्रा. प्रज्ञेश पाडावे, प्रा. आरती उटीकर, प्रा. स्वाती जाधव आदी उपस्थित होते.
डॉ. मालती यांना उत्कृष्ट नेतृत्व, महाविद्यालयाचा सर्वांगीण विकास, महाविद्यालयाच्या विविध विभागांमध्ये योग्य समन्वय व गुणवत्तेच्या निकषांवर सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला.
डॉ. मालती यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग चा नावलौकिक हा संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये वृद्धिंगत होतं आहे. त्यांचं नियोजन कौशल्य आणि विविध विषयांना समय सूचकतेने हाताळण्याची सचोटी यामुळेच येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शैक्षणिक वातावरण प्रदान होत आहे, व याचाच परिणाम म्हणून विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये निर्विवाद यश संपादन करीत आहेत आणि विविध स्पर्धांमध्ये ते महाविद्यालयाचा नावलौकिक उंचावत आहेत.डॉ. पी मालती यांच्या नेतृत्वामध्येच National Board of accreditation नवी दिल्ली यांच्याकडून कॉलेज मधील विविध डिपार्टमेंट्स ना मानांकन मिळाले आहे.
तब्बल 4000 विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग आकुर्डी ची धुरा त्या समर्थपणे सांभाळत आहेत.
त्यांना मिळालेल्या या यशाबद्दल संकुलाचे अध्यक्ष मा. श्री सतेज पाटील तसेच संस्थेचे ट्रस्टी मा.श्री तेजस पाटील, डी वाय पाटील एज्युकेशनल कॉम्प्लेक्स चे कॅम्पस डायरेक्टर रियर ऍडमिरल श्री अमित विक्रम (निवृत्त) यांनी विशेष कौतुक केले.
कॉलेजमधील विविध विभागांचे विभाग प्रमुख, प्राध्यापक व कर्मचारी वृंद यांनी या यशाबद्दल डॉ. मालती यांचे अभिनंदन केले आहे.