प्रा.चव्हाण यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
कोंचिंग क्लासेस असोशियशनच्या अधिवेशनात गौरव

” गणेश चव्हाण आदर्श शिक्षक पुरस्कार”
पिंपरी (प्रतिनिधी) कै. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि आरोही फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सांगवी येथील जीडीसी आयएएस अकादमीचे संचालक प्रा. गणेश डी. चव्हाण यांना प्रदान करण्यात आला.
“पुणे येथे भरविण्यात आलेल्या कोचिंग क्लासेस असोसिएशनच्या चौथ्या राज्यव्यापी अधिवेशनात त्यांना हा सन्मान देण्यात आला .
यावेळी कोचिंग क्लासेस असोसिएशन महाराष्ट्र चे अध्यक्ष डॉ. पंढरीनाथ वाघ, पुणे जिल्हा अध्यक्ष प्रा. यशराज चव्हाण यांच्या हस्ते सन्मान देण्यात आला .
गेल्या 8 वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात सातत्याने योगदान देणारे गणेश चव्हाण यांनी युपीएससी, एमपीएससी आणि गट ब व क परीक्षांसाठी हजारो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या अध्यापन शैलीत शिस्त, स्पष्टता आणि विद्यार्थी प्रियता यांचा सुंदर समन्वय आहे. विद्यार्थ्यांसाठी त्यांनी जीडीसी संपूर्ण स्टेट बोर्ड 360° व्हि्युज ” हे हजार पानांचे महत्त्वपूर्ण पुस्तक तयार केले असून, यासाठी त्यांच्या पत्नी प्रा.सोनाली चव्हाण यांचे सहकार्य मिळत आहे .
करोना च्या काळात विद्यार्थ्यांना फ्री नोट्स देऊन व शिक्षणाच्या क्षेत्रात डिजिटल क्रांतीत महत्त्वाची भूमिका बजावताना, त्यांनी जीडीसी आयएएस अकादमी यूट्यूब चॅनल आणि जीडीसी अकादमी ऍपच्या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची संधी दिली. टेस्ट सिरीज, नोट्स, चालू घडामोडी आणि टॉपर्स मुलाखतींसारख्या सुविधा ऑनलाईन उपलब्ध करून दिल्या आहेत.
प्रा. चव्हाण म्हणाले कि,”या यशामागे आई,-वडील, विद्यार्थी, सहकारी शिक्षक, पालक आणि मित्रपरिवार यांचे योगदान आहे. त्यांच्या विश्वासामुळेच मी या क्षेत्रात नावलौकिक मिळवू शकलो.”