गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त निगडीत विविध कार्यक्रम
रक्तदान, भक्तीगीत, हसवणूक होणार

गजाजन महाराज मंदिर चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष रामभाऊ पिसे यांची माहिती
पिंपरी (प्रतिनिधी )निगडी से.२७,प्राधिकरण येथील श्री गजानन महाराज मंदिर चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने दि १९ ते २७ या दरम्यान गजानन महाराज प्रकट दिन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अध्यक्ष रामभाऊ पिसे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
दि. १९ रोजी सकाळी महाराज्यांच्या पादुका पूजन व अभिषेक होईल तर संध्याकाळी प्राधिकरण परिसरातून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे.
दि २० रोजी प्रकट दिनी सकाळी काकड आरती महापूजा, भक्ती गीत असे धार्मिक कर्यक्रम होईल.
दुपारी १ ते ४ महाप्रसाद होईल.
दुपारी १ ते ३ : आशुतोष सुरजुसे प्रस्तुत “अभंगवारी” भक्तीसंगीताचा कार्यक्रम : आशुतोष सुरजुसे गायिका – मोनिका देशमुख तबला : विठ्ठल दानव, पखवाज-पवन झोडगे सादर करतील.
३ वा,मराठी हास्यसम्राट फेम प्रा. अजितकुमार कोष्टी यांचा हसवणूक कार्यक्रम होईल.
४ वा. पं सुरेशजी वाडकर यांच्या शिष्या ज्योती गोराणे यांचा भावगीत भक्ती गीताचा कार्यक्रम होणार आहे.
६ वा ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील (आळंदी) यांचे कीर्तन होईल.
गजानन महाराज मंदिरात रॉबिन हूड आर्मी, निसर्गराजा मित्र जीवांचे यांच्या सहकार्याने यावेळी भव्य दिवसभर भव्य रक्तदान शिबीर होणार आहे.
दि. २१ फेब्रु २०२५
सायं. ४ ते ६ भजन गजानन महिला भजनी मंडळ, निगडी
सायं. ६ ते ८ शब्दरंग कला साहित्य कट्टा, निगडी प्रस्तुत “बहुविध कार्यक्रमांची रंगारंग पर्वणी ”
सादरकर्ते : चंद्रशेखर जोशी आणि सहकारी
सायं ८ आरती हस्ते सुनील मामाजी सिंघल, नंदकिशोर गायधने
* दि.२२ फेब्रु २०२५ *
सायं. ४ ते ६ भजन भक्तीसुधा भजनी मंडळ, प्राधिकरण : प्रवचन (दासनवमी) ह.भ.प. अपर्णा कुलकर्णी
सायं. ६ ते ८ सायं. ८ ते ८.३०आरती : हस्ते श्री. शहा, हेमंत मिश्रा
* रविवार दि. २३ फेब्रुवारी २०२५ *
सायं. ४ ते ६ भजन सुखदा भजनी मंडळ, रावेत
सायं ६ ते ८. वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज रचित खंजेरी भजन सादरकर्ते : श्री गुरुदेव सेवा मंडळ, श्री क्षेत्र देहुगांव
सायं ८.आरती हस्ते : डॉ. अजय महाजन व श्री अनिरुध्द हिसल व सहकारी
* दि. २४ फेब्रु २०२५ *
सायं. ४ ते ६. भजन वैदेही भजनी मंडळ, प्राधिकरण
सायं. ६ ते ८: प्रवचन – विषय “गुरुकृपा” : सादरकर्ते आनंद जोशी
सायं ८.३० : आरती हस्ते सौ व श्री रमेश ढमढेरे
* मंगळवार दि. २५ फेब्रुवारी २०२५ *
सायं. ४ ते ६ सायं. ६ ते ८ भजन नवचैतन्य भजनी मंडळ, प्राधिकरण : नादवेद प्रस्तुत “भक्तीरंग” भावगीत-भक्तीगीत कार्यक्रम : सादरकर्ते सौ. शर्मिला शिंदे
सायं ८ वा आरती हस्ते – सौ. व श्री. शिवाजी खैरे सौ. व श्री. अरुण खैरे
* महाशिवरात्र दिनी दि. २६ फेब्रुवारी २०२५
स ७ वा महाभिषेक, रुद्राभिषेक व आरती
सकाळी ९.३० हस्ते – सौ. व श्री. महादेवराव कथले : श्रींची आरती सौ. व श्री. कैलास कथले :
४ वा भजन, ज्ञानदीप महिला भजनी मंडळ, प्राधिकरण
६ वा. कीर्तन सादरकर्ते – ह.भ.प. प्रज्ञा देशपांडे, चिंचवड ८ वा : आरती हस्ते सौ. व श्री. रवि कळंबकर सौ. नंदकुमार पंचपोर
* दि. २७ फेब्रु २०२५ *
सायं ६वा, स्वरसंपदा म्युझिक अकॅडमी प्रस्तुत “भक्तीभाव स्वरधारा” भावगीत भक्तिगीतांची एक सुरेल संध्या गायिका : संपदा वाळवेकर
८:३० वा : आरती हस्ते आसावरी गाडे, प्रणव जोशी
९ वा, महाप्रसाद