सामाजिक

शेखबाबा ट्रस्टकडून महिलांना अन्नधान्य, साडी, शिरखूर्मा साहित्य वाटप

बाबा आलम यांच्या पुढाकाराने सुमारे बाराशे महिलांना मदतीचा हात

पिंपरी(प्रतिनिधी) निगडी यमुना नगर येथील शेख बाबा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने निगडी परिसरातील सर्व जाती धर्मातील बाराशे गरजू महिलांना अन्नधान्य, अडीजशे विधवांना साडी वाटप, तर एक हजार मुस्लिम महिलांना शिरखर्मा साहित्य वाटप करण्यात आले. हा वाटपाचा कार्यक्रम तीन दिवस वाटप सुरु होता .
यावेळी माजी नगरसेवक अजित गव्हाणे, पंकज भालेकर ,मौलाना ईश्तीयाक शेख , मौ. मुशर्फ शेख,फिरोज सय्यद , हुसैन जमादार, मौ अब्दुल शेख , मौ. समशाद कारी, मौ. गुलाम रसूल, ट्रस्टचे अध्यक्ष बाबा आलम शेख, समीर शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
दुसऱ्या दिवशी माजी नगरसेवक दत्ता पवळे, कमल घोलप, के डी वाघमारे,टि डी राऊत,ऍड राजेंद्र काळभोर, सोमनाथ शेळके, धनंजय शेट्टे आदी मान्यवर उपस्थित होते. तिसऱ्या दिवशी माजी नगरसेविका सुमन पवळे, सुलभा उबाळे, योगिता नागरगोजे, रेश्मा साळवी, राहुल शिंपले, गुलाब जाधव,छाया पाटील, देवानंद ढगे आदी उपस्थित होते.
यावेळी निगडी, यमुना नगर,ओटास्कीम, त्रिवेणी नगर, रुपीनगर या परिसरातील गरजू महिलांना जीवनाश्यक वस्तू वाटप करण्यात आले.
सूत्रसंचालन आदिकेत वाघमारे यांनी तर आभार समीर शेख यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वैशाली पवार, हुसैन जमादार, सोहेल शेख, मनोज शेलार यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button