निगडी येथील श्री खंडोबा मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी भाविकांची गर्दी*
खंडोबा ट्रस्ट कडून भक्तांसाठी नियोजन

निगडी गावचे ग्रामदैवत श्री खंडोबा मंदिरात सुमारे 200 वर्षापुर्वीचे स्वयंभू शंकराची ( पाच तांदूळाची ) पिंड व खंडोबाची मुर्ती आहे. कालांतराने मंदिराचा जीर्णोद्धार झाला.
या मंदिरात दरवर्षी खंडेरायाची यात्रा,चंपाषटी सोहळा तसेच आषाढी वारीत देहू ते पंढरपूर असा संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा पायी जात असतो पंरतू पंढरपूर येथून पुन्हा पालखी सोहळ्याचे देहूकडे प्रस्थान होते या वेळी पालखी सोहळ्याचा शेवटचा विसावा व महाआरती याच खंडोबा मंदिराच्या प्रांगणात होत असते तसेच या मंदिरात काकडी आरती,सप्ताह, राम जन्म,कृष्ण जन्म, दत्त जन्म, शिवजयंती असे अनेक धार्मिक कार्यक्रम होत असतात.या सर्व कार्यक्रमावेळी उपस्थित असलेल्या सर्व भाविकांना देवस्थान च्या वतीने महाप्रसाद वाटप करण्यात येतो.
*आज महाशिवरात्री निमित्त मंदिरात पहाटे काकडा आरती संपन्न झाला तसेच सर्व भाविकांच्या उपस्थित देवस्थान चे सदस्य श्री आकाश तानाजी काळभोर व अॅड सौ.धनश्री आकाश काळभोर यांच्या हस्ते शंकराच्या पिंढीस व खंडोबा च्या मुर्तीस महाअभिषेक करण्यात आला* या नंतर महाआरती करून उपस्थित असलेल्या सर्व भाविक भक्तांना प्रसाद वाटप करण्यात आला.*या वेळी आमदार सौ.उमाताई खापरे तसेच देवस्थान चे अध्यक्ष तानाजी काळभोर,उपाध्यक्ष सोमनाथ काळभोर, खजिनदार जंगलीमहाराज काळभोर,कार्याध्यक्ष शंकर आप्पा काळभोर,सचिव भाऊसाहेब काळभोर, विश्वस्त राजेंद्र लक्ष्मण काळभोर तसेच सदस्य संभाजी काळभोर,सुशांत मोहिते,इंद्रसिंग राजपूत,सुधीर ढगे, सतिश झेंडे ,मंदिराचे पुजारी मार्तंड रेवी तसेच ग्रामस्थ व पंचकृषितील भाविक भक्त मोठ्या संख्खेने उपस्थित होते*