शैक्षणिक

खाद्य महोत्सवातून कोकणी, थायलंड,इंडोनेशिया संस्कृतीचे दर्शन

डॉ तेलंग हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये फूड फेस्टिव्हल

चिंचवड(प्रतिनिधी) येथील कॅम्प एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ. अरविंद ब. तेलंग इन्स्टिट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट मध्ये दि.२५ रोजी तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या “कोस्टल कलिनरी फूड फेस्ट” ( मॅजिक ऑफ कोंकण, इंडोनेशिया आणि थायलंड) या खाद्य महोत्सवातून कोंकणी,इंडोनेशिया आणि थायलंड संस्कृतीचे दर्शन घडवून आणले.
यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ प्रमोद पाटील, हॉ. कॉनरॉडचे महाव्यस्थापक अभिषेक सहाय, रॅडीसन हॉटेलचे महाव्यवस्थापक पंकज सक्सेना, कॅम्प एजुकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष वालचंद संचेती,
उपाध्यक्ष यु. टी. पुंडे, सचिव बी. व्ही. जवळेकर , खजिनदार एस. डी. अगरवाल, सदस्य डॉ. आय. एस. मुल्ला,प्राचार्य. डॉ. अजयकुमार राय आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण “ कोंकण, इंडोनेशिया आणि थायलंड चे कोस्टल फूड ” हे असून विद्यार्थ्यांनी परिधान केलेला विविध प्रांतीय पोशाख, सर्वत्र केलेली सजावट या सर्वामुळे खरोखरच “कोस्टल फुड” साठी आल्याचा जाणवत होते. या खाद्य महोत्सवात सर्व पदार्थ पारंपारिक शैलीत बनविलेले कोकणी अळू वडी, कोबी भाजी, वांगी मसाला, फणसाची भाजी, घावन, तांदळाची भाकरी, पावटा भात, कोंकणी डाळ ,उकडीचे मोदक, मूंग डाळीचे कढण, इंडोनेशियाचे सोतो सूप, बेतुटू , पनीर स्प्रिंग रोल, इकन बाकर , चिकन रेंडंग , कॅनई रोटी, नस्वी, गोरेंग , कोकोनट बावारोस आणि थायलंडचे टॉम यम सूप, थाई पीनट कौलीफ्लॉवर विंग्स, चिकन सताय, थाई मस्सामन करी, थाई ग्रीन चिकन करी, थाई टी क्रीम बृले पदार्थ बनविण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख अतिथीच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि गणेश वंदना करून करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध पारंपरिक कोंकणी नृत्य सादर करून रसिकांचे मनोरंजन केले. त्यामध्ये कोंकण, इंडोनेशिया आणि थायलंड येथील पारंपारिक वेशभूषा केलेला रॅम्प वॉक प्रथम व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी सादर केला. प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी कोळी नृत्य सादर केले. तसेच तृतीय वर्षातील राहुल या विद्यार्थ्याने फ्लाईरोलॉजी सादर केले. विद्यार्थ्यांनी केलेला शेवटचा रॅम्प वॉक लक्षवेधी ठरला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अजयकुमार राय यांनी केले. सूत्रसंचालन प्राची कोल्हे, शिफा सिंग यांनी केले. तर वेदांत हिरेमठ याने आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button