
पिंपरी (प्रतिनिधी) दि इन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया पिंपरी चिंचवड शाखा अध्यक्ष पदी “सी ए वैभव मोदी ” यांची निवड 2025-26 या वर्षासाठी करण्यात आली . निगडी येथील संस्थेच्या कार्यालयात नुकत्याच घेण्यात आलेल्या निवडणूकींत त्यांची निवड जाहीर करण्यात आली. मावळते अध्यक्ष सीए पंकज पाटनी यांच्याकडून “सीए वैभव मोदी” यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली.
संस्थेचे नियुक्त केलेल्या अन्य पदाधिकारयांमध्ये उपाध्यक्षा सी ए सारिका चोरडीया, सेक्रेटरी- सीए मनोज मालपाणी , खजिनदार- सीए महावीर कोठारी, अध्यक्ष सीए विद्यार्थी संघटना- सीए धीरज बलदोटा, समिती सदस्य – सी ए शैलेश बोरे , सीए सचिन ढेरंगे यांचा समावेश आहे.
संस्थेचे सी ए सदस्य आणि विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा ,कर विषयक ज्ञान प्रसार, परिसंवाद, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि इतर समाज उपयोगी उपक्रम वर्षभर राबविण्याचा संकल्प असल्याची माहिती अध्यक्ष पदी “सी ए वैभव मोदी” यांनी दिली.
फोटो ओळ –
मध्यभागी बसलेले – अध्यक्ष -“सी ए वैभव मोदी”
डावीकडून उभे – अध्यक्ष सीए विद्यार्थी विद्यार्थी संघटना- सीए धीरज, सेक्रेटरी- सीए मनोज मालपाणी, सी ए सारिका चोरडीया- उपाध्यक्ष, खजिनदार- सीए महावीर कोठारी.