शैक्षणिक

दापोडीच्या गणेश इंटरनॅशनल स्कूलला सीबीएसईची मान्यता

अध्यक्ष एस बी पाटील यांची माहिती

दापोडी , २६ फेब्रुवारी 2025 – दापोडीतील गणेश इंटरनॅशनल स्कूलला केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची (सीबीएसई ) अधिकृत मान्यता सीबीएसई मान्यता क्रमांक: 1131459 नुकतीच प्राप्त झाली आहे. ही मान्यता 01 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2030 या कालावधीसाठी देण्यात आली असून, शाळेच्या शैक्षणिक प्रवासातील हा एक मोठा महत्त्वाचा टप्पा आहे.
ही मन्याता एस. एस. पी. ग्रुप ऑफ इंस्टीट्यूटचे अध्यक्ष एस. बी. पाटील यांचे अमूल्य योगदान आहे.

या यशाचे श्रेय संस्थेचे संचालक एस . बी. पाटील , संस्थेचे विश्वस्त गणेश पाटील, आकाश पाटील , मंगेश पाटील , सचिव चंद्रकांत पाटील , प्रशासकीय अधिकारी प्रकाश गायकवाड , सहयोगी संचालक सुनील शेवाळे , शाळेच्या मुख्याध्यापिका सिओना त्रिभुवन , सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकवर्ग यांच्या अथक परिश्रमाला जाते. शाळेने गेल्या काही वर्षांत अत्याधुनिक शिक्षण सुविधा, डिजिटल वर्गखोल्या, प्रयोगशाळा आणि खेळासारख्या उपक्रमांवर विशेष भर दिला आहे.

सीबीएसई मान्यतेमुळे विद्यार्थ्यांना आता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक संधी उपलब्ध होतील. आधुनिक शिक्षण प्रणाली, नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती आणि विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्तम शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याचा शाळेचा संकल्प आहे.
शाळेचा पुढील उद्देश विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक सुविधा, संशोधनपर शिक्षण आणि कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून देणे हा आहे. गणेश इंटरनॅशनल स्कूल आता सीबीएसई मान्यतेसह आणखी अधिक जोमाने आणि आत्मविश्वासाने पुढे जाणार आहे.
ही मान्यता मिळवण्यासाठी योगदान दिलेल्या सर्व शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार!
शिक्षण क्षेत्रात आणखी नवे उच्चांक गाठण्यासाठी गणेश इंटरनॅशनल स्कूल सज्ज आहे!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button