डी वाय पाटील इंजिनियरिंग कॉलेज आयोजित मॅरेथॉनमध्ये कर्करोगाच्या जनजागृतीसाठी आकुर्डीत धावले हजारो जण
रोटरी क्लब प्राधिकरण आणि सतेज फौंडेशनचा पुढाकार

पिंपरी (प्रतिनिधी) आकुर्डी येथील डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, रोट्रॅक्ट क्लब ऑफ डीवायपीसीओई, सतेज स्पोर्ट क्लब, रोटरी क्लब ऑफ प्राधिकरण पुणे, डीवायपीसीओई माजी विदयार्थी असोशियशन यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन आकुर्डी येथे संपन्न झाली . समाजात स्तन कर्करोग जागृती होण्यासाठी धावले हजारो जण.
यावेळी एव्हरेस्ट वीर श्रीहरी तापकीर, रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 चे युथ डायरेक्टर बलवीर चावला, डी वाय पाटील प्रतिष्ठानचे विश्वस्त तेजस पाटील, बांधकाम व्यवसायिक खुशी अभिचंदानी, डी वाय पाटील शैक्षणिक संकुलाचे संचालक रियर एडमिरल अमित विक्रम , प्राचार्या डॉ. पी. मालती , प्रशासकीय अधिष्ठाता डॉ. संदीप सरनोबत या आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये 23 मार्च रोजी पहाटे 5:30 वा. उद्घाटन सोहळा पार पडला.
ही मॅरेथॉन 3 किमी, 5 किमी आणि 10 किमी अशा टप्प्यांमध्ये झाली.
मॅरेथॉन मध्ये विजय झालेला स्पर्धकांची नावे खालील प्रमाणे :
10 किमी (पुरुष ) – प्रथम मोहम्मद दानेश द्वितीय पियुष सोळंकी तृतीय अक्षत
10 किमी (महिला ) – प्रथम मिताली भोयर द्वितीय विशाखा शिंदे तृतीय निशा पासवान
5 किमी ( पुरुष ) – प्रथम अजय शिंदे द्वितीय सुहास जाधव तृतीय विवेक उत्तेकर
5 किमी (महिला ) – प्रथम सोमती कोडग द्वितीय सविता ठोंबरे तृतीय रिंकू यादव
3 किमी ( पुरुष ) – प्रथम सार्थक शिंदे द्वितीय वैभव वैभव गोगर्डे तृतीय साहिल यादव
3 किमी (महिला ) – प्रथम शांभवी वेदपाठक द्वितीय नीलम शिंदे तृतीय भूमिका शिक्रे
सदर मॅरेथॉन मध्ये भारतीय धावपटूंसोबतच, इथोपिया देशाच्या आंतरराष्ट्रीय धावपटू कु. देसी निगेसे कितीला, शिफाईना गोबेना अरसे आणि अमन रासा मुहम्मद यांनी सहभाग नोंदवला.
एकूण 1000 पेक्षा जास्त स्पर्धकांनी याच्यामध्ये भाग घेतला होता.
45 हजार रुपये पेक्षा जास्त किमतीची बक्षिसे यामध्ये विजेत्यांना दिली गेली.
या स्पर्धेसाठी समन्वयक म्हणून आबाजी माने आणि तृप्ती वाघ यांनी काम पाहिले.
या मॅरेथॉनच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व विभाग प्रमुख प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
डी वाय पाटील आकुर्डी संकुलाचे चेअरमन सतेज पाटील, डॉ. डी वाय पाटील प्रतिष्ठानचे विश्वस्त तेजस पाटील, डॉ. डी वाय पाटील शैक्षणिक संकुलनाचे संचालक रियर एडमिरल अमित विक्रम (निवृत्त) महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पी. मालती, प्रशासकीय अधिष्ठाता डॉ. संदीप सरनोबत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.