सीएमएस नर्सरीचे केरळच्या राज्यपालांच्या हस्ते उदघाटन
राज्यपाल अर्लेकर यांच्याकडून सीएमएसचे कौतुक

पिंपरी (प्रतिनिधी) निगडी येथील सीएमएस संचालित सीएमएस इंग्लिश मिडीयम हायर सेकण्डरी स्कुलच्या नर्सरी विभागाचे उदघाटन केरळ राज्याचे राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सीएमएसचे अध्यक्ष टी.पी विजयन, सरचिटणीस सुधीर सी.नायर, खजिनदार पी अजयकुमार, कलावेदी प्रमुख पी.व्ही भास्करन, मुख्यद्यापिका डॉ.बीजी गोपकुमार पिल्ले , चैताली लोंढे आणि संचालक मंडळ आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्यपाल अर्लेकर म्हणाले कि,सीएमएस विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी धडपड करीत आहे. हे कौतुकास्पद आहे. त्यांचे शैक्षणिक योगदान खरोखरच वखाणण्याजोगे आहे. भारतीय संस्कृती जगात महान आहे.बालपणीच मुलांना घरात आणि शाळेत संस्कार मिळाल्यास मुलं घडतील. त्यामुळे राष्ट्र उभारणी साठी हातभार लागेल. यासाठी पालकांनी पुढाकार घेतला पाहिजेत.
सूत्रसंचालन सजिता पिल्ले यांनी केले.प्रास्ताविक सुधीर नायर यांनी तर अध्यक्षीय भाषण विजयन यांनी केले तर आभार बीजी गोपकुमार यांनी मानले.